एका बाजूला जवळपणाचं बंधन होतं तर दुसऱ्या बाजूला प्रेमाच्या नात्यात भौगोलिक अंतर अजिबात जाणवत नाही. लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमधली कपल्स एकमेकांवरचा गाढ विश्वासच कसा एकमेकांना जवळ ठेवतो ते सांगतात.

‘आठवण येतेय.. भेटूया ?’
‘कसं शक्य आहे?.. आत्ता एवढा प्रवास करण्यात किती वेळ जाईल ..’
‘मग..?’
‘घरी आहेस ना.. टेरेसवर जा आणि चंद्र बघ कसा सुंदर दिसतोय’
‘बघितला.. सुंदरच दिसतोय.’
‘अगं, मी पण इथून चंद्र बघतोय आणि तू तिथून..भेटलो की आपण..ते पण चंद्रावर!’
एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे ते दोघं.. एकमेकांपासून दूर राहावं लागतंय, तरीही त्यांच्यातलं प्रेम तितकंच ताजंतवानं, टवटवीत फुललेल्या मोगऱ्यासारखं! सतत एकमेकांसोबत राहून आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर, प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगणारी, पझेसिव्हनेसमुळे भांडणारी कपल्स पाहिली की, त्यांना वाटतं आपण दूर असूनही मनाने किती जवळ आहोत आणि हे एकमेकांसोबत असूनही मनाने मात्र प्रचंड दूर. एकमेकांच्या सततच्या सहवासाची सवय होऊन मनाने हळवं होण्यापेक्षा दूर राहूनही प्रेम फुलतं.. जास्त चांगलं फुलतं.. असं त्यांचं म्हणणं! आपल्या पार्टनरवर संपूर्णपणे विश्वास टाकून त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करायला ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’च शिकवते.
ती नाइटआउटला गेलेली असते, त्याला तिची काळजी वाटत असते, पण तो फक्त ‘काळजी घे’ म्हणण्यापलीकडे काहीच करू शकत नसतो. त्याला कमी मार्क्‍स मिळाल्यावर तिच्याही जीवाची घालमेल होत असते, पण भेटणं शक्य नसतं. अशा वेळी एकमेकांना शब्दांनी दिलेला आधारच मदत करतो. प्रेमाची आठ र्वष एकत्र घालवलेली आणि आता लग्न ठरल्यावर दूर राहावं लागत असलेली फॅशन डिझायनर हर्षांली म्हणते, ‘पझेसिव्हनेस ही बाब त्रास करून घेण्याची मुळातच नाहीये. त्याचा पझेसिव्हनेस हा आपल्या काळजीने असतो आणि त्याला प्रेमानेच हाताळता आलं पाहिजे. लाँग डिस्टन्स असो किंवा कोणतीही रिलेशनशिप असो, विश्वास मुद्दाम जपायची गरज पडू नये, तो आपोआप असलाच पाहिजे. सगळ्या गोष्टी एकमेकांशी स्वत:हून शेअर केल्या की विश्वास जपण्यासाठी वेगळे काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. एकमेकांच्या साथीची आठ र्वष आता ‘लग्ना’त परिवर्तित होताना आमच्यातलं नातं एका वेगळ्या टप्प्यावर आहे आणि लांब राहूनसुद्धा आमच्यातल्या विश्वासाला किंचितही धक्का लागलेला नाही.’
लाँग डिस्टन्स रिलेशनशिप ही भासते तेवढी कठीण नसते, असं नुकतंच लग्न झालेली अश्विनी माहीमकर म्हणते. आपल्या पार्टनरवर संपूर्ण विश्वास, दोघांमधलं अंडरस्टँडिंग आणि पॉझिटिव्हिटी यामुळे नात्यातला कम्फर्ट टिकून राहतो. आधी दोघंही ‘जेट एअरवेज’मध्ये नोकरी करत होतो, मात्र ‘दुबई एमिरेट्स’ची संधी मिळाल्यावर त्याला दुबईला जावं लागलं. ‘लग्नाआधी जसे ‘बेस्ट फ्रेंड्स’ होतो तसेच लग्नानंतरही राहू असं आम्ही लग्नाच्या सात वचनांसोबत एकमेकांना दिलेलं आठवं वचन होतं. त्यामुळे आमच्यात कधीच ट्रस्ट इश्यू आलाच नाही.’ एकमेकांना मिळणारी ‘स्पेस’ या गोंडस नावाखाली त्या ‘स्पेस’ची मोठ्ठी ‘गॅप’ कधी होते ते आपलं आपल्यालाच कळत नाही. ही दरी पडू द्यायची नसेल तर एकमेकांवरचा विश्वास हा कृतीतून दिसायला हवा.
फोन, चॅटिंग, व्हिडीओ कॉल्स यामुळे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणावं तितकी त्रासदायक राहिलेली नाही, उलट ती एन्जॉय करता येऊ शकते. आपल्या दृष्टिकोनावर आपलं रिलेशनशिप स्टेटस ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ आहे की ‘हॅप्पिली एंगेज्ड’ आहे हे अवलंबून आहे. विश्वास, प्रेम आणि एकमेकांची ओढ यामुळे दुरावाही खूप सोपा होऊन जातो. आफ्टर ऑल, डिस्टन्स डझन्ट मॅटर व्हेन टू हार्ट्स आर लॉयल टू इच अदर, हे या बाबतीत खरं ठरतं. हॅप्पी व्हॅलेन्टाइन डे!

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष