आला उन्हाळा, त्वचा सांभाळा..

सनस्क्रीन लोशन्स, अँटीटॅनिंग क्रीम यांच्यामागे लपवून त्वचेचं रक्षण करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात.

(संग्रहित छायाचित्र)

उन्हाळ्यात घाम येणं, नेहमीपेक्षा जास्त ऊ न लागणं, अवसान गळून गेल्यासारखं होणं, थकल्यासारखं वाटणं, सतत तहान लागणं अशी नानाविध लक्षणं दिसतात, मात्र या उन्हाळ्यात सगळ्यात जास्त जर कशावर परिणाम होत असेल तर ती म्हणजे आपली त्वचा.

हल्लीच्या जमान्यात सतत ‘प्रेझेंटेबल’ राहण्याकडे लक्ष दिलं जातं. मात्र या काळात चेहरा तेलकट होणं, पिंपल्स येणं, चेहरा आणि हात ‘टॅन’ होणं म्हणजेच काळे पडणं अशी अनेक लक्षणं दिसून येतात. त्यामुळे चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेक सोपस्कार केले जातात. सनस्क्रीन लोशन्स, अँटीटॅनिंग क्रीम यांच्यामागे लपवून त्वचेचं रक्षण करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात. पण त्यातला नेमकेपणा कोणीच लक्षात घेत नाही. बाजारात मिळणाऱ्या क्रीम्सचा त्वचेवर कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय सातत्याने मारा केला जातो आणि त्याचा वाईट परिणाम म्हणजे त्वचा आणखी खराब होऊ  शकते. अमूक एका प्रकारच्या त्वचेसाठी कोणतं क्रीम वापरावं यासाठी स्कीन एक्स्पर्टचा सल्ला घेण्याऐवजी दूरदर्शनवरच्या जाहिराती पाहून आपल्या मनानुसार सनस्क्रीन प्रॉडक्ट्स वापरण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. या गोष्टीचा सगळ्यांनाच तोटा होतो असं नाही मात्र सतत प्रदूषण, ऊ न, धावपळीमुळे खाण्याच्या सतत बदलणाऱ्या पद्धती यामुळे त्वचेच्या गरजा बदलतात ज्यांचा आपण फार गांभीर्याने विचार करत नाही. काही जणांना उन्हापासून रक्षण करण्यासाठी कोणतंही क्रीम चालतं तर काही जणांना त्याच क्रीमचा त्रासही होऊ  शकतो, ही बाब आपण लक्षात घेत नाही.

त्वचा उत्तम ठेवण्यासाठी जसं तुमच्या त्वचेला अनुसरून योग्य ते क्रीम लावणं महत्त्वाचं तसंच उन्हातून फिरताना शक्यतो चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळणं आणि हातात ‘स्किन्स’ घालणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सकाळी ऑफिसमध्ये मेकअप करून जाणं ज्यांना बंधनकारक असतं त्यांना उन्हामुळे, प्रवासात येणाऱ्या घामामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. मेकअप करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे फाऊंडेशन. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही कोणत्या प्रकारचं फाऊंडेशन वापरता ते महत्त्वाचं आहे. एवॉन इंडियाच्या सेलिब्रिटी मेक-अपतज्ज्ञ रेणुका पिल्लाई यांच्याशी उन्हाळ्यातील मेकअप क सा करावा याविषयी चर्चा केली असता त्यांनी मेकअपच्या वेगवेगळ्या पैलूंवर विशेष माहिती दिली. सर्वप्रथम फाऊंडेशन्सबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ‘जेल फाऊंडेशन तुम्हाला एकसमान, शीअर बेस अर्धपारदर्शक कव्हरेज देते, तसंच ते पटकन वाळते, त्यामुळे ते योग्यप्रकारे मिसळण्यासाठी लवकर लवकर काम करावे लागेल. तरुण, नितळ त्वचा असलेल्या लोकांसाठी जेल फाऊंडेशन्स अगदी सुयोग्य असतात.’  क्रीम-टू-पावडर फाऊं डेशन पटकन आणि सहजपणे लावता येण्यायोग्य असते. यामुळे त्वचेला पावडर लागल्यासारखा इफेक्ट मिळतो. अशाप्रकारची फाऊंडेशन्स मध्यम ते पूर्ण कव्हरेज देतात, मात्र सूक्ष्म रेषा, सुरकुत्या आणि कोरडी त्वचा ठळकपणे दिसते.

मूस फाऊं डेशन, ज्याला विप्ड फाऊं डेशन असे देखील म्हणतात, ते पॉट किंवा टय़ूबमध्ये येते आणि मध्यम ते पूर्ण कव्हरेज देते. मूस फाऊं डेशन मॅट, पावडरी फिनिशसोबत सहजपणे पसरते आणि तुम्हाला अवजड वाटू देत नाही. हे सर्व प्रकारच्या त्वचेला साजेसे असते.

क्रीम फाऊं डेशन तुमच्या कॉम्प्लेक्शनला वेल्वेटसारखा लुक देते आणि मध्यम ते पूर्ण कव्हरेज व एकसमान फिनिश देते. हे कॉम्पॅक्ट्मध्ये येते आणि याला थोडेसे जास्त मिसळावे लागते, पण याचे परिणाम मनासारखे असतात.

लिक्विड फाऊं डेशन हलका, नैसर्गिक कव्हरेज देते आणि ते क्रिमी, द्रवरूप वॉटर बेस फॉम्र्युल्यामध्ये येते. लिक्विड फाऊं डेशन्समध्ये मॉयश्चरायजर असते आणि ती कोरडय़ा किंवा परिपक्व त्वचेसाठी वापरत असले तरी सर्व त्वचेच्या प्रकारासाठी सुयोग्य असतात.

फाऊंडेशन्स जरी मेकअपमधला महत्त्वाचा घटक असला तरी उन्हाळ्यात इतर मेकअपमधल्या गोष्टींचा त्वचेवर विशेष परिणाम होऊ  शकतो. त्यामुळे फाऊंडेशन्सप्रमाणेच आपण इतर मेकअप काय करतो हेही लक्षात घेतलं पाहिजे. याबद्दल विचारले असता रेणुका यांनी सांगितले की वसंत ऋतूसाठी नो-मेकअप लूक मिरवणं कधीही योग्य आहे. न्यूड मेकअप तुम्हाला तुमचं नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याची संधी देतो, हा तुमच्या त्वचेवर हलकेपणा भासवून देतो. लाइट मेटॅलिक आयश्ॉडो वापरा ज्यामुळे डोळ्यांना खोली देता येईल. ओठांवरील न्यूड कलर सोबत लूकला फिनिश करता येईल. या नो मेकअप लूकप्रमाणेच बोल्ड कलर्स या उन्हाळ्याचे वैशिष्टय़ ठरणार आहेत. डोळ्यांसाठी देखील गडद रंग सुंदर दिसतील. हेअर जेल वापरून चमकदार, स्लिक लूकसाठी केसांपर्यंत तुमचा वेट लूक विस्तारित करता येईल’.

उन्हाळ्यात त्वचेच्या देखभालीसाठी काही टिप्स :

* उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त एसपीएफ (सन प्रोटक्शन फॅक्टर) पुरेसं नाही. तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी ब्रॉड स्पेक्ट्रम सन प्रोटेक्शन लोशनचा वापर करा. तसाच फक्त चेहराच नाही तर हात, दंड, मान, पाठ यांना देखील हे लोशन लावायला विसरू नका.

* तसंच, फेशियल ऑइल्स हा देखील या उन्हाळ्यात एक उत्तम पर्याय ठरू शकेल. लाइट वेट फेशियल ऑइल नैसर्गिक सीड ऑइल्सचे संमिश्रण असते  उन्हाळ्यात यामुळे खडतर हिवाळी ऋतूनंतर तुमच्या त्वचेला कवर करता येते. हिवाळ्यात हे मॉयश्चरायजरप्रमाणे काम करते आणि निस्तेज त्वचेला पुनरुज्जीवन देते. त्यामुळे हे ऑल राऊंडरप्रमाणे त्वचेची देखभाल करते, या उत्पादनाला प्रत्येक मुलीच्या व्हॅनिटीमध्ये या ऋतूत नक्कीच स्थान मिळेल.

* उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबूरस टाकून महिनाभर आंघोळ करावी. त्यामुळे त्वचेचा रंग साफ होतो.

* मेकअप करणं गरजेचं असलं तरी चेहऱ्यावरील सूक्ष्म रंध्रे मेकअपमुळे बंद होणार नाहीत याची काळजी घ्या. तुमच्या त्वचेला श्वास घेऊ  द्या. आणि विशेष म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हा मेकअप स्वच्छ धुऊ न टाकायला विसरू नका.

* भरपूर पाणी पीत राहा.

* मेडिटेशन आणि दीर्घ श्वसनामुळे मन शांत होतं. रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे त्वचेवर एक वेगळंच तेज येतं. दररोज ५ मिनिटे दीर्घ श्वसन केल्यामुळे त्वचा टवटवीत राहते.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Skin care tips for summer season

Next Story
पं. मनोहर चिमोटे
ताज्या बातम्या