अतुला दुगल
पूर्वी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर राहत असताना आईसोबत या वारकऱ्यांना काही खायला देणे होत असे, मोठे झाल्यावर ही वारी म्हणजे काय हे समजायला लागले व मी स्वत: देवभक्त असल्याने पुणे शहरापुरती वारीत सहभाग घेऊ लागली. अनवाणी अवस्थेत, धोतर व एकूणच कपडय़ाचे भान न ठेवता, खांद्यावर भगवा घेऊन उन्हा-तान्हाची पर्वा न करता देवाच्या नावाचा अखंड जप करीत हे वारकरी पालखीची मिरवणूक काढतात ते सगळंच थक्क करून टाकणारं आहे. एवढे तल्लीन होऊन ते नामस्मरण करतात की कोणत्याही प्रकारच्या असुविधांची त्यांना आठवण येत नाही, त्यांच्या तुलनेत आपण शहरातील सुशिक्षित व समंजस माणसे छोटय़ा छोटय़ा गोष्टीबाबत उगाचच तक्रार करतो असे वाटते. या वारकऱ्यांची एकूणच एनर्जी थक्क करणारी व प्रेरणा देणारी अशीच आहे.

सुखदा यश
अजित भैरवकर दिग्दर्शित ‘गजर’ हा सगळा चित्रपटच आळंदी ते पंढरपूर अशा ‘पंढरीच्या वारी’वर असल्याने त्यानिमित्ताने अठरा दिवसांचा मी या वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व प्रचंड शहारले आणि थोडीशी बदललेदेखील! या वारीत प्रत्यक्ष चित्रीकरण करताना स्त्री-कलाकार कपडे कसे बदलणार वगैरे मला शंका होत्या व उत्सुकतादेखील होती. प्रत्येक टप्प्यातून चित्रीकरण करताना हॉटेलमध्ये राहायची व्यवस्था असल्याने काही समस्या सुटल्या, पण दुप्पट ताकत लावावी लागली. रणरणत्या उन्हात मी, चिन्मय मांडलेकर, कॅमेरामन अमोल गोळे इत्यादींनी काम केले, पण वारीत सहभागी झालेल्या भक्तांची विलक्षण निष्ठा पाहून मी थक्क झाले. खाण्यापिण्याची-श्रमाची कसलीही पर्वा न करता ते अखंडपणे चालत होते. त्यांच्यापुढे आम्ही कोण? एकदा तर त्याच गर्दीत आमच्या युनिटची चुकामूक झाली व त्या गोंधळात- धडपडीत मला विलक्षण तहान लागली, जवळपास पाणी मिळण्याची शक्यताही नव्हती. माझा वाढता कासावीसपणा पाहून शेजारील दिंडीतील एका स्त्रीने तिची अर्धी बाटली मला दिली तेव्हा आपल्याला पाणी शिल्लक राहील अथवा नाही याची चिंता केली नाही. त्या क्षणाने मला खूपच शिकवले. स्वत:ची पर्वा न करता तिने मला वेळीच मदत केली. अशी माणसे खूप दुर्मीळ आहेत, ती या वारीत भेटतात. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरची शांतता व समाधान मला या क्षणीही आठवत आहे. मी देवभक्त आहे, पण व्यक्तिपूजेवर माझा विश्वास नाही. माझा कर्मावर विश्वास आहे, एक अनामिक शक्ती कार्यरत आहे, असे मी मानते.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

वृन्दा गजेंद्र
मी प्रचंड देवभक्त आहे, त्यामुळे गजेन्द्रच्या ‘विठ्ठल विठ्ठल’ या चित्रपटाचे प्रत्यक्ष वारीतच चित्रीकरण करायचे ठरवले तेव्हा मी सुखावले. कारण त्या वेळी देवभक्त व अभिनेत्री अशा दोन्ही भूमिकांतून मला एक नवा अनुभव मिळणार होता. संपूर्ण वारीभर चांगले ऊह होते, पण एकादशीला मात्र भरपूर पाऊस आला. आम्ही जवळपास सलगच चित्रीकरण केले, रात्री भक्तांच्या तंबूतही काम केले, तसेच चित्रपटातील भारूड-भजन यासाठी प्रत्यक्ष भक्तांनी आम्हाला खूप सहकार्य केले हा रोमांचक अनुभव ठरला. या भक्तांची देवभेटीची ओढ विलक्षण प्रामाणिक असते. त्यात शिस्तही असते. वारीतील रिंगण हा रोमांचक प्रकार आहे. शिस्तबद्धता, लयबद्धता व भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ही वारी, लाखोंचा जनसमुदाय जमूनदेखील कसलीही गडबड-गोंधळ नसल्याचे जगातले बहुधा हे एकमेव उदाहरण असावे. त्या वारीतील ऊर्जा व सकारात्मक भावना हे सगळंच विलक्षण अलौकिक आहे. माझ्यातील देवभक्ताला अभिनयाच्या निमित्ताने वारीचा अनुभव घेता आला, हे मी माझे नशीब समजते.

सिया पाटील
मी प्रत्यक्ष वारीत सहभागी झाले नाही, पण सांगली जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील राजेवाडी या गावापासून अध्र्या तासाच्या अंतरावरून वारी जाते म्हणून माझ्या घरून वारकऱ्यांसाठी लाडू, चिवडा असे काही पदार्थ पाठवले जातात. या वर्षी मी त्यासाठी दोन वेळच्या चहाचे पैसे पाठवले, अशा मार्गानेही वारीत सहभाग घेता येतो. दोन वर्षांपूर्वी याच दिवसांत माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ऐन वारीतच चंद्रभागा नदीत त्यांच्या अस्थीचे विसर्जन केले. हा माझ्यासाठी भावपूर्ण अनुभव ठरला. या वारीशी माझा संबंध असा वेगळा.