गायत्री हसबनीस

न्यू इयर फॅशन पार्टी असो वा मित्रमैत्रिणींबरोबर एकत्र जमून कुठल्या तरी निसर्गरम्य ठिकाणी केलेली भटकंती वा डिनरचा बेत असो.. आपले कपडे, अ‍ॅक्सेसरीज सगळी तयारी अपटुडेट असायला हवी. नव्या वर्षांचा रंग आणि फॅशन लक्षात घेऊन स्टाईल से मावळत्या वर्षांला निरोप द्यायला काय हरकत आहे..

Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…
What Kangana Said?
“आपल्या देशात पॉर्नस्टारला जितका आदर..”, सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केलं ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

म्हणता म्हणता हे वर्ष संपत आले आहे आणि सगळीकडे नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह दिसू लागला आहे. खरंतर अजूनही कोणाचाच विश्वास बसत नाही आहे की इतक्या वेगात हे  वर्ष सरलं आहे आणि आपण  २०२२ मध्ये प्रवेश करतो आहोत. पण. हा आश्चर्याचा सुखद धक्का पेलत मंडळी जोमाने बाहेर हिंडू -फिरू लागली आहेत. त्याचबरोबर खाणंपिणं, मजामस्ती आणि मुख्यत: फॅशन याकडे तरुण मुलंमुली विशेष लक्ष देत आहेत. न्यू इयर सेलिब्रेशन हे अर्थातच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धुमधडाक्यानेच करण्याचे प्लॅन आखले आहेत. तरीही सध्या ओमायक्रॉनच्या चिंतेमुळे लावलेल्या र्निबधांची किनार या सेलिब्रेशनला असणार आहे. सर्वतोपरी काळजी घेत सगळेच आपापल्यापरीने नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सेलिब्रेशनचं प्लॅनिंग आहे आणि त्यात फॅशन नसेल तर ते सेलिब्रेशन कसलं? न्यू इयर सेलिब्रेशनची पार्टी असेल किंवा छोटेखानी गेट टुगेदर.. आपला लुक टॉप असावा यासाठी भरपूर यंदा उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आम्हाला हव्या तशा रंगाची आणि ढंगाची फॅशन करण्यासाठी  संधी मिळते आहे, असं तरुणाईचं मत आहे.  मावळत्या वर्षांला निरोप देताना नव्या वर्षांच्या फॅशनचा वेध घेत त्यानुसार स्टायिलग करण्यासाठी सध्या बाजारात काय काय उपलब्ध आहे याचा हा धावता आढावा..

२०२२ या वर्षांचा रंग ‘व्हेरी पेरी’ हा असेल असा अंदाज अमेरिकेतील ‘पेन्टॉन’ या संस्थेने वर्तवला आहे. फॅशनमध्येही या रंगाचे वर्चस्व असेल असं म्हटलं जात आहे. व्हेरी पेरी हा जांभळय़ा रंगाच्या जवळ जाणारा रंग आहे. त्यामुळे ऑनलाईन संकेतस्थळांवर तुम्ही शोधलंत तर लव्हेंडर रंग अधिक पाहायला मिळेल. अर्थात हा गोंधळ असला तरी जांभळय़ा रंगाच्या वेगवेगळय़ा छटांबरोबरच इतरही रंगच्छटांचे  स्टायलिश कपडे तुम्हाला यंदा बाजारात मिळतील. या वेळी काळा, राखाडी, अबोली, निळा, हिरवा, मरून, लाल आणि केशरी हे रंग ट्रेण्डमध्ये आहेत.

पार्टी वेअर

सेलिब्रेशन म्हणजे पार्टी. पार्टी म्हणजे फॅशन आणि फॅशन म्हणजे शिमर किंवा ग्लिटर लूक – हे समीकरण गेले तीन वर्षे कायम ट्रेण्डमध्ये आहे. थोडक्यात ते या वर्षीही फॉलो केले जाईल हे स्पष्ट आहे. काही मुलींना ग्लिटर लुक फारसा आवडत नाही. त्यांच्यासाठी काळय़ा, पांढऱ्या किंवा अगदीच न्यूड रंगांचे ऑफबीट वनपीस किंवा गाऊन, टॉप उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना हटके ज्वेलरी पेअर करण्याची संधी मिळते. ग्लिटर लुक करणाऱ्यांना मात्र अशा ड्रेसवर ज्वेलरी कोणती पेअर करायची? हा प्रश्नच असतो. ग्लिटर की ज्वेलरी? हे निवडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मग जर तुम्ही ग्लिटर लूकचा त्याग करायला तयार असाल तरीही तुम्हाला वेगळा लूक करता येईल. त्यासाठी सिम्पल गाऊन आणि वनपीसमध्ये भरपूर पर्याय आहेत. सिम्पल गाऊन किंवा वनपीसमध्ये फॅब्रिकमधील वैविध्य आजमावता येतं, तसं ते ग्लिटरच्या बाबतीत होत नसलं तरी त्यातही विविध प्रकारचे ड्रेस पर्याय उपलब्ध आहेत यात शंका नाही. फॅब्रिक वेगळे असले की स्टाइलची रचनाही वेगळी करता येते आणि एम्ब्रॉयडरीलाही वाव मिळतो. फॅब्रिकचा विचार केला तर  गाऊनमध्ये क्रेप, वेलवेट, नेट, ट्रान्सपरन्ट, प्युअर कॉटन असे प्रकार मुख्यत्वे उपलब्ध आहेत. स्टायिलगच्या बाबतीत म्हणाल तर ऑफ शोल्डर, फुल हॅन्ड, बलून हॅन्ड, पोनी स्टाईल, सिन्ड्रेंला लुक, स्लीव्हलेस, फ्लोरल डिझाईन, बॅकलेस, क्लोज नेक, वेलवेट डिझाइन, मल्टिकलर, नेट गाऊन, स्ट्रॅपलेस असे प्रकार आजही बाजारात हमखास मिळतील. वनपीसमध्येही रफल्स, फ्लेअर्स, स्ट्राइप्स, जॅकर्ड ड्रेस, शर्ट ड्रेस, मार्हकॅश ड्रेस, कोट ड्रेस असे प्रकार उपलब्ध आहेत. ग्लिटर आणि शिमरमधील कपडे हे क्लब किंवा मिड नाइट पार्टीसाठी तुम्ही वापरू शकता. यामध्ये गाऊन आणि वनपीस तर आहेतच, पण त्याचसोबत टॉप्स आणि पॅन्ट्सही आहेत. यात सध्या बॉडीकोन गाऊन, सिक्वीन ड्रेस, मॅक्सी ड्रेस, सिथेंटिक टी ड्रेस हे प्रकार खूप गाजत आहेत. तसं पाहिलं तर लाल रंगाची चलती अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे स्कार्फ, स्वेटर, स्वेटशर्ट, जॅकेट असे थंडीतले कपडे विकत घ्यायला गेलात तर लाल रंगातले स्टायलिश विंटर वेअर मिळतील. एकूणच यंदा पर्सनलाइज्ड फॅशनवर भर आहे, त्यामुळे आपल्या आवडीनुसार पर्याय आहेत आणि ते ट्रेण्डीही आहेत. करोनानंतर सगळय़ांनीच कंबर कसली असल्याने यंदा लोकल मार्केट, शॉपिंग मॉल आणि ऑनलाइन म्हणाल तिथे फॅशनेबल कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजचा बाजार सजलेला आहे.

अ‍ॅक्सेसरीज आणि शूज

यंदा शूजमध्ये युनिसेक्स फॅशनवर जास्त भर दिसतो आहे. स्निकर्सचा ट्रेण्ड परत आला आहे. मुलींमध्ये सेमी हिल्स, पेन्सिल हिल्स, हिल्सचे झीपर लेदरचे बुट, थ्रेड असलेल्या हिल्स तसेच न्यूड आणि ब्राऊन रंगाच्या सॅन्डल्सचा ट्रेण्ड कायम आहे. अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलायचं तर कानातल्यांमध्ये हुप्स, डायमंड आणि रिंग्स आहेत. तर गळय़ातील आभूषणांमध्ये चोकर अजूनही चलतीत आहेत. त्याशिवाय बारीक चेन्स, लॉकेट्स आणि अंगठय़ा ट्रेण्डमध्ये आहेत.

नाताळ आणि न्यू इयर फॅशनसाठी काही खास टिप्स

सगळय़ांनाच न्यू इयर पार्टी क्लबमध्ये करता येणार नाही. काहीजण नुसतेच वेगळय़ा शहरात भटकंतीसाठी जाताना दिसतील. अशा वेळी तरुणांनी लाल स्वेटरसह लाल रंगाचा स्वेटशर्ट वॉर्डरोब कलेक्शनमध्ये ठेवायला हरकत नाही. सहज बाहेर फिरायला जाताना किंवा डिनरला जाताना त्याच्या जोडीलाच ट्रेच कोट आणि फिटबेल जीन्स पेअर करता येईल. रेड टेप मेन्स ब्लाउसन कॉटन स्वेटर, रेमंड मेन्स कन्टेंपररी लोकर स्वेटर आणि अ‍ॅमेझॉन ब्रॅण्डचा सिम्बॉल मेन्स क्लासिक अ‍ॅक्रेलिक स्वेटर अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे, जो तुम्ही हमखास परिधान करू शकता. तर तरुणींसाठीही लाल रंगाच्या विविध छटांमधला मॅक्सी ड्रेस उपलब्ध आहेत. त्यावर सिंगल लाइन्ड ब्लेझर आणि उंच टाचांच्या काळय़ा सॅन्डल पेअर करून तुम्ही तुमचा हटके लुक साधू शकता. अ‍ॅमेझॉन फॅशनवर वेरो मोडाचा वुमन्स सिंथेटिक ए-लाइन मॅक्सी ड्रेस आहे, वुमन्स चेरी रेड सॉलिड स्लिम फिट राउंड नेक स्लीव्हलेस मॅक्सी ड्रेससह अन्य ब्रॅण्ड्सचेही वुमन्स मॅक्सी ड्रेस उपलब्ध आहेत. तसेच मिस्टलेटो हिरव्या रंगाचा स्केटर ड्रेसही मुली परिधान करू शकतात. यावर लांब इअरिरग, स्लिंग बॅग आणि हिल्स योग्य ठरतील. अ‍ॅमेझॉन ब्रॅण्डचा वुमन्स कॉटन स्केटर नी लेन्थ ड्रेस, फॅब अ‍ॅलीचा वुमन्स कॉटन स्केटर मिनी कॅज्युअल ड्रेस व मिस ऑलिव्हचा वुमन्स स्केटर मिडी ड्रेसही या साईटवर उपलब्ध आहेत.  हलक्या वजनाचे ट्रेण्डी स्कार्फ हाही स्टायिलग पूर्ण करण्यासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतो. यामध्ये वी फॉर वुमन या ब्रॅण्डचा वुमन्स कॉटन स्टोल, फॅबनेस्ट वुमनचा वुलन ब्लेन्ड व्हाइट सेल्फ डिझाइन विंटर स्कार्फ आणि सर्वात आकर्षक असा सत्या पॉलचा वुमन्स प्युअर सिल्क पिंट्रेड स्कार्फदेखील उपलब्ध आहेत.

viva@expressindia.com