नोव्हेंबर-डिसेंबर महिना आला की फॅशन शो आणि वेगवेगळय़ा फॅशन प्लॅटफॉर्म्सवर नामांकित फॅशन डिझायनर्स, ब्रॅण्ड्सकडून खास विंटर कलेक्शन यायला सुरुवात होते. लॅक्मे फॅशन वीकचा विंटर सीझन होऊन गेला आहे. देशभरातून चार मुख्य राज्यांतून होणाऱ्या ‘ब्लेंडर्स प्राइड ग्लासवेअर फॅशन’ टूरची नांदी झाली आहे. करोनानंतर फॅशन बाजारपेठेत पुन्हा उभं राहण्याच्या दृष्टीने वेगवेगळय़ा फॅशन ई-कॉमर्स साइट्स आणि फॅशन लेबल्सकडून ऑटम-विंटर कलेक्शन्स सादर व्हायला लागले आहेत. ‘अ‍ॅमेझॉन फॅशन इंडिया’ने नोव्हेंबर-डिसेंबरमधील लग्नसराई आणि थंडीचा मौसम लक्षात घेत फेस्टिव्ह आणि ऑटम-विंटर कलेक्शन्स उपलब्ध करून दिलं आहे. ‘रिव्हर’ कलेक्शन नावाने अ‍ॅमेझॉन फॅशन ब्रॅण्डने नामांकित फॅशन डिझाइनर्सच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे प्रिंट, डिझाइन्सचे कलेक्शन मार्केटमध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. यंदा ‘रिव्हर’चं तिसऱ्या पर्वाचं कलेक्शन उपलब्ध झालं आहे.

स्टाइलिश, फॅशनेबल कपडय़ांना गेल्या काही वर्षांत आणि विशेषत: करोनानंतर मागणी वाढते आहे. हे लक्षात घेत अ‍ॅमेझॉन फॅशनने २०२० मध्ये ‘रिव्हर’ या नव्या फॅशनेबल ब्रॅण्डची सुरुवात केली होती. तिसऱ्या पर्वात फॅशन डिझाइनर्स नरेंद्र कुमार आणि राजदीप राणावत यांनी डिझाइन केलेले कलेक्शन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘गेल्या काही वर्षांत फॅशनेबल कपडय़ांना खूप मागणी आहे. फॅशनप्रेमींना वेगळं, हटके कलेक्शन देण्यासाठी फॅशन डिझाइनर्सनी डिझाइन केलेले कपडे सहज उपलब्ध करून द्यावेत हा आमचा ‘रिव्हर’ कलेक्शनमागचा उद्देश आहे. हे कलेक्शन त्यांना दुकानात किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर सहज उपलब्ध होणं गरजेचं आहे. फॅशन डिझाइनर्सनाही त्यांची डिझाइन्स मोठय़ा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ‘रिव्हर’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे’, अशी माहिती अ‍ॅमेझॉन फॅशन इंडियाचे प्रमुख आणि संचालक सौरभ श्रीवास्तव यांनी दिली.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?
Loksatta viva A glamorous celebration of fashion Lakme Fashion Week Geo World Garden
लॅक्मे फॅशन वीकची सेलिब्रिटी मांदियाळी

नवीन कलर पॅलेट्स आणि स्टाइल्स हे यंदाच्या रिव्हर कलेक्शनचं वैशिष्टय़ असल्याची माहिती प्रसिद्ध फॅशन डिझाइनर नरेंद्र कुमार यांनी दिली. नोव्हेंबर-डिसेंबरमधील लग्नसराई आणि एकूणच उत्साहाचा माहौल लक्षात घेत फेस्टिव्ह आणि ट्रॅव्हल वेअर्समधील ट्रेण्डी कपडे स्त्रियांच्या कपाटात असायला हवेत, हा विचार या कलेक्शनमागे होता. त्यातही डेली वेअरसाठी हे कपडे कसे वापरता येतील, याचाही विचार करण्यात आला असल्याचं नरेंद्र कुमार यांनी सांगितलं. फ्लोरल अ‍ॅरबेस्क, ग्राफिक, पेस्ली आणि जॉमेट्रिक प्रिंटच्या माध्यमातून ही डिझाइन्स करण्यात आली आहेत. रंगांचा विचार करताना ब्रन्ट अर्थ, यलो, रस्ट, सिएन्ना, नटमेग आणि अर्दी पेस्टल्स रंगांबरोबरच नैसर्गिक रंगांच्या जवळ जाणाऱ्या हिरवा आणि निळय़ा रंगांचा डिझाइन्समध्ये वापर करण्यात आला असून कुर्ता, ड्रेसेस, टॉप्स आणि ट्राऊझर्सचं कलेक्शन उपलब्ध केलं असल्याची माहिती नरेंद्र कुमार यांनी दिली. तर रिव्हरमधील दुसरं कलेक्शन फॅशन डिझाइनर राजदीप राणावत यांनी डिझाइन केलं आहे. ‘रबारी’ या नावाने सादर झालेलं हे कलेक्शन राजस्थान आणि कच्छमधील रबारी या आदिवासी समाजाच्या परंपरांवरून प्रेरित असल्याचे राजदीप यांनी स्पष्ट केले. राजस्थानमधील नक्षीकाम म्हटल्यावर नक्षीदार मोटीफ, मिररवर्क, विणलेलं नक्षीकाम, बीड्सचा मुबलक वापर आलाच. त्यामुळे या सगळय़ाचा वापर रिव्हरमधील रबारी कलेक्शनमध्ये पाहायला मिळेल, असे राजदीप यांनी सांगितले.

कपडय़ांची योग्य निवड तुम्ही केली तर कुठल्याही प्रसंगात तुम्ही रुबाबदार, उठावदार दिसू शकाल, त्यामुळे कोणत्या प्रसंगासाठी कोणत्या प्रकारची पिंट्र-डिझाइन्स आणि स्टाइलचा वापर करणार हे ठरवून घ्या, अशी टीप राजदीप यांनी दिली. तर केवळ डिझाइनर कपडे नव्हे त्याला योग्य अशा अ‍ॅक्सेसरीजची जोडही तुम्हाला द्यायला हवी, असं नरेंद्र कुमार यांनी स्पष्ट केलं.