केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचे वलय असतानाही सामान्य मतदाराशी नाते जपणाऱ्या सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे अल्पावधीत तरुणाईच्या गळ्यातील ताईत ठरल्या. विधानसभेत वैधानिक आयुधांचा योग्य वापर करत, सत्ताधारी बाकावरूनही आपल्या मतदारसंघातील सामान्य जनतेच्या, सोलापूरच्या यंत्रमाग कामगारांच्या समस्या विधानसभेत मांडताना सरकारी यंत्रणांच्या त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवत आपल्या नव्यानेच सुरू झालेल्या राजकीय कारकिर्दीवरही आभ्यासूपणाचा ठसा उमटविणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्याशी मनमोकळ्या गप्पांची संधी लोकसत्ता ‘व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर मिळणार आहे. राजकारण करतानाही तरुणाईच्या आवडीनिवडी जपणे, वाचन, व्यासंग, छंद आणि सामाजिक समस्यांचे भान असणारे मन जपणे ही कसरत प्रणिती शिंदेंनी अल्पावधीत साध्य केली. त्याचे गुपितही याच गप्पांमधून उलगडणार आहे.
तारीख : ९ मे २०१३
वेळ : दुपारी ३. ३०
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,
२५२, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प)   
प्रवेश सर्वासाठी खुला आहे.