शब्दांकन: श्रुती कदम

पॉडकास्ट हा शब्द हल्ली जळी—स्थळी ऐकू येतो. आतापावेतो वाचनाची आवड असलेले, एकेका बैठकीत पुस्तकंच्या पुस्तकं रिचवणारे वाचनवेडे आपण पाहिले आहेत. मात्र आता वाचण्याबरोबरच ऐकण्याचा फंडा तरुण पिढीत रुळतो आहे. ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट्स, स्टोरीटेलसारखे अ‍ॅप्स कितीतरी माध्यमातून आता कथा—विचार ऐकले जातात. ऐकता ऐकता आवडलेला विचार वाचकांबरोबर शेअर करणारं ‘ऐकू आनंदे’ हे नवं सदर..

how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ
Forbes India 30 Under 30 list for 2024 special focus on the remarkable achievements of Five women In different categories
Forbes India: ‘फोर्ब्स’च्या यादीमध्ये या ‘पाच’ प्रसिद्ध अन् यशस्वी महिलांची वर्णी; जाणून घ्या
Chandrapur, Murder Case, Friend Killed, Buried, dumping yard, five arrested,
चंद्रपूर : मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात

अगर आपको खुदका पोटेन्शन बढ़ाना है, तो आपको फिजिकल के साथ अपनी मेंटल स्ट्रेंग्थ भी बढमनी चाहिए और यह सिर्फ योग से होगा।

यूटय़ूबवर रणबीर इलाहबादी या यूटय़ूबरचा त्याच्याच नावाने एक प्रसिद्ध पॉडकास्ट चॅनेल आहे. यामध्ये तो अनेक विषय हाताळत असतो. सामाजिक मुद्दे, मानसिक तणाव, आंतरराष्ट्रीय सीमांवर सुरू असलेले युद्ध, आध्यत्मिक गोष्टी, आजचा फॅशन ट्रेण्ड असे अनेक विषय तो सातत्याने मांडत असतो. त्यासाठी तो त्याच्या चॅनेलवर त्या त्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या लोकांना बोलावतो. आणि त्यांच्याशी गप्पा मारत विविध मुद्दय़ांवर सगळय़ांना मार्गदर्शन करतो. मी खरंतर लॉकडाउनमध्ये पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केली. रणबीर इलाहबादीचे अनेक प्रसिद्ध आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या विषयांवर पॉडकास्ट आहेत. पण त्याच्या एका भागात त्याने मेडिटेशन योगा या विषयावर मार्गदर्शन केलं होतं.

याच पॉडकास्टमधील ‘अगर आपको खुदका पोटेन्शन बढमना है, तो आपको फिजिकल के साथ अपनी मेंटल स्ट्रेंग्थ भी बढमनी चाहिए और यह सिर्फ योग से होगा।’ हे वाक्य माझ्या जास्त लक्षात राहिलं. या भागात रणबीर इलाहबादीने दिवसातून २० मिनिटं मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला किती फायदे होऊ शकतात आणि आपण कशा तऱ्हेने त्याचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकतो याविषयी सांगितलं आहे. आपल्यातील कार्यक्षमता, कौशल्य वाढवण्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. त्यासाठी नवीन काही ना काही करण्याची धडपड करत असतो आणि त्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाची गरज असते. मला हे नवीन काही करून पाहण्याचं प्रोत्साहन आणि त्यासाठीचं मार्गदर्शनही या भागातून मिळालं. मी महाविद्यालयात प्राध्यापक आहे, त्यामुळे मला विद्यार्थ्यांना शिकवताना पूर्वतयारी करावी लागते. तसंच वर्ग सुरू असतानाही खूप शांत आणि संयमाने सगळय़ा विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे शिकवावं लागतं. ही मनाची शांतता आणि एकाग्रता मिळवण्यासाठी योगाचं महत्त्व मला या पॉडकास्टमुळे समजलं. त्याचा मला खूप जास्त फायदा झाला. त्यामुळे केवळ ऐकून न थांबता मी प्रत्यक्ष योगा करायलादेखील सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे खरोखरच मला दिवसभर शांत राहण्यासाठी या योगाचा खूप फायदा होतो आहे. केवळ योग किंवा मन:शांतीसाठीचे विषयच नव्हे तर रणबीर इलाहबादीच्या पॉडकास्ट चॅनेलमुळे चालू घडामोडींबद्दल आणि नवीन विषयांबद्दलदेखील मला ऐकायला मिळतं. सहजपणे आपली कामं सांभाळून पॉडकास्टमुळे हे नवनवीन विषयांची माहिती घेणं शक्य झालं आहे. – अंकिता पोयरेकर (प्राध्यापक)