शब्दांकन: श्रुती कदम

‘‘सवालों के शहर मैं अकेले जवाब हो तुम

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

पर अफ़सोस ज़वाब को जानकर उसकी जरुरत कम हो जाती है।’’

‘पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले’ हा रेड एफएमवर प्रसारित होणारा प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या पॉडकास्टमध्ये आर. जे. लक्ष्य दत्ता प्रेक्षकांशी आपल्या प्रेयसीच्या स्वरूपात संवाद साधतो. या पॉडकास्टमध्ये तो नैना या पात्रासोबत संवाद साधतो. तिला आपल्या मनातील व्यथा सांगतो. याच पॉडकास्टमधील ‘ना तुम हमे जानो’ या भागात त्याच्या ‘लव्ह अ‍ॅट फस्र्ट साइट’विषयी आर. जे. लक्ष्य नैनाला सांगत असतो. त्याला पाहताच क्षणी आवडलेली मुलगी नक्की कोण आहे? आणि कुठे राहते? अशा अनेक प्रश्नांत अडकलेला आर. जे. लक्ष्य तिची प्रशंसा करताना वरचा संवाद म्हणतो. ‘सवालों के शहर मैं अकेले जवाब हो तुम, पर अफ़सोस के ज़वाब को जानकर उसकी जरुरत कम हो जाती है।’ त्याच्या अशा स्वरचित शायरीचा प्रयोग तो अनेकदा पॉडकास्टमध्ये करतो. त्याचं हे वाक्य माझ्या लक्षात राहिलं.  अनेकदा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडते. मात्र त्या  व्यक्तीविषयी आपण जाणून घेतल्यानंतर त्याच्याविषयी वाटणारी हुरहुर, त्याचं महत्त्व कमी होतं, अशी त्याच्या मनातील खंत तो व्यक्त करतो.

मला काही पॉडकास्ट ऐकण्याची खास क्रेझ नाही; पण मी लहानपणापासून एफएम आवडीने ऐकतो. रेड एफएमवर प्रसारित होणारे बरेचसे कार्यक्रम मी ऐकत असतो. त्यातला आर.जे. लक्ष्य दत्ताचा ‘पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले’ हा पॉडकास्ट मी नेहमी मनापासून ऐकतो. सध्या त्याच्या या पॉडकास्टचा दुसरा सीझन सुरू आहे. प्रेम हा विषय जगभरातील प्रत्येकाच्या जवळचा आहे. प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात प्रेम अनुभवलेलं असतं, त्याचे बरे-वाईट परिणाम पाहिलेले असतात. आपण अनेक लोकांना भेटत असतो, पण त्यातील काही लोक पहिल्या भेटीतच मनात घर करतात, तर काही लोक हळूहळू विस्मृतीत जातात. पहिल्याच भेटीत मनात घर करून जाणाऱ्या व्यक्तीची भेट.. असाच एक गोड अनुभव मीही घेतला आहे. म्हणून मला हा ‘पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले’ या पॉडकास्टमधील ‘ना तुम हमे जानो’ हा भाग जास्त आवडला. – प्रणव कांबळे (सीए विद्यार्थी)