शॉपिंग मूड.. फिल गुड !

मूड ऑफ आहे, निराश वाटतंय तर मग चलो शॉपिंग हा अनेक जणींचा फंडा असतो. यालाच रिटेलथेरपी म्हणतात.

मूड ऑफ आहे, निराश वाटतंय तर मग चलो शॉपिंग हा अनेक जणींचा फंडा असतो. यालाच रिटेलथेरपी म्हणतात. पण रिटेलथेरपीमुळे ऊठसूट शॉपिंग करण्याची सवयही लागते. त्यातून शॉपोहोलिक व्हायला होतं. काय आहे ही रिटेलथेरपी?
‘तो’ नि ‘ती’ मॉलमध्ये जातात.. फ्रस्ट्रेशन येतं म्हणून. ‘तो’ खूपच महागाच्या दोनच गोष्टी घेतो. तर ‘ती’ पिशव्या भरभरून शॉिपग करते. ‘तिनं’ आवश्यक गोष्टीच घेतल्यानं बिल कमी होतं. तिच्या पिशव्या बघून नि बिल बघून तो आणखी फ्रस्ट्रेट होतो. ‘प्यार के साइड इफेक्ट्स’मध्ये राहुल बोस नि मल्लिका शेरावतच्या ब्रेकअपनंतर हे घडतं. चित्रपटात पुढं काय होतं, ते महत्त्वाचं नाहीये. तर आपापल्या मनोवस्थांतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शॉिपगचा आधार घेतला होता असं दिसतं. खरंच शॉिपगमुळं आपला मूड सुधारतो का? आहे तरी काय ही शॉपिंग थेरपी?
 शॉपिंग आपण सगळेच करतो. कारण शॉिपगनं मूड सुधारतो, ही रिसर्च फॅक्ट आहे. त्याला ‘रिटेलथेरपी’ही म्हणतात. रिटेल म्हणजे आपण थोडं काहीतरी घेतो. ते होलसेल नसतं. याला ‘फिल गुड शॉिपग’ही म्हणतात. त्यामुळं फक्त मूड छान होतो असं नाही तर आपण स्वत:चाही विचार करू लागतो. त्यामुळं नातेसंबंधांतले तणाव, आत्मविश्वासाची कमतरता, व्यावसायिक अपयशाच्या भीतीतून बाहेर पडायला मदत होऊ शकते. हे शॉपिंग महागडी किंवा मोठी वस्तू असावं, असं नाहीये. काही वेळा ठरवून केलेलं रिटेल शॉपिंगही मूड सुधारायला मदत करतं. काही वेळा एखादी गोष्ट घ्यायची असतेच. मग आपण जाऊन ती घेतो. त्यानं आपल्याला बरं वाटतं. याकडं ‘गििव्हग रिवॉर्ड टू वनसेल्फ’ असं बघितलं जातं. त्यामुळं आपण नकारात्मक विचारांपासून काही काळापुरतं डायव्हर्ट होतो. शॉपिंगला घराबाहेर पडल्यानं चार जणांना भेटणं होतं नि तो विचार तात्पुरता विसरला जातो. त्या तेवढय़ा वेळापुरता तरी मूड ठीक होतो.
 सायकॉलॉजिस्ट मानसी जोशी म्हणतात की, ‘शॉपिंगचं दुसरं टोक गाठण्याला ‘कम्पल्सिव्ह शॉपिंग’ म्हणतात. ‘मला घेतलंच पाहिजे काहीतरी’ असं वाटून कम्प्लसिव्हली काही लोकशॉिपग करतात. तसं नाही घेतलं तर अस्वस्थ वाटणं हे चांगलं लक्षण नाही. कारण त्यामुळं ती सवयच होते. काही वेळा खूप खुशीत किंवा अतिआनंदात असताना लोकमोठं शॉिपग करतात. नंतर लक्षात येतं की मला याची गरज नव्हती किंवा ही वस्तू खूपच महागडी आहे किंवा ती घ्यायची माझी ऐपत नव्हती. याला ‘सिम्टम ऑफ मेनिया’ किंवा ‘मूड डिसऑर्डर’ म्हणतात. प्लॅन बनवणं हे त्या डिसऑर्डरचं लक्षण आहे. त्याच्यामध्ये शॉिपगही येईल. हे शॉिपग छान वाटणारं असलं तरी त्यातून विविध अडचणी विशेषत: आíथक समस्या निर्माण होऊ शकते.’
 मानसी जोशी पुढं म्हणतात की, ‘कॉलेजमधील मुलांच्या खिशातल्या पॉकेटमनीनं ते मूड चांगला करण्यासाठी खरेदी करतात, असं फारसं होत नसेल. बरेचदा रिटेलथेरपी अनेक लग्नं झालेल्या गृहिणींमध्ये लागू पडते. लग्न झालेल्या असं म्हणण्याचं कारण की त्यांना संसाराशिवाय इतर व्यवधानं नाहीयेत. शॉिपग हे कामच त्यांना दिल्यानं त्या शॉिपग करू शकतात. नोकरी करणाऱ्या बायकांच्या हातात पसा असल्यानं ऑफिसला जाता-येता हवं ते घेऊ शकतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये शॉिपगचं प्रमाण कमी आहे. पण तेही शॉिपग करतात. काही वेळा औपचारिकतेचा भाग म्हणून त्यांना शॉिपग करायला सांगितलं जातं. शॉिपग प्रमाणात असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कम्प्लसिव्ह शॉिपगवर उपाय आहेत. त्यांना सायकॉलॉजिकल हेल्प घ्यायला लागेल. हे फक्त एक लक्षण आहे. रोग वेगळा आहे. त्या व्यक्तीला स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन असं काही असू शकेल. त्या कम्प्लसिव्ह शॉिपगमागचं कारण शोधून त्यावर काम करायला लागेल.’
लोकांच्या भावनांच्या अभ्यासाअंती दिसलंय की, प्रत्येकाला कधी तरी एकटेपणाची- आयुष्यातल्या पोकळीची जाणीव होते. ही जाणीव बाजूला सारण्यासाठी काही लोकनृत्य-संगीतादी कलांमध्ये रमण्यासारख्या सकारात्मक गोष्टी करतात. काही जण मात्र स्मोकिंग, िड्रकिंग नि अतिशॉिपग इत्यादी नकारात्मक गोष्टींत आधार शोधतात. पण शॉिपगवर अतिखर्च करून मन:शांती मिळत नाही. आपल्या समस्येचा खुल्या दिलानं स्वीकार करायला शिका. आपल्या अतिशॉिपगमागचं कारण हुडकून काढा. आत्मविश्वास दृढ करा. त्यानंतर मग ‘फिल गुड शॉिपग’ करण्यास काहीच हरकत नाही.       
 काही शॉपिंग फ्रीक मैत्रिणींना आपल्या या आवडीविषयी काय वाटतं, त्यांना रिटेल थेरपी माहिती आहे का?

शॉपिंग फ्रिक की शॉपोहोलिक
शॉपिंगमुळं मूड सुधारतो, म्हणून अलीकडं अनेकांचं शॉिपग आवडलं नि घेतलं असं असतं. िवडो शॉिपगही खूपदा चालतं. ऑफर्स नि सेल वगरेंवर लक्ष ठेवून असणारी मंडळीही चिक्कार आहेत. तसे गरजेनुसार शॉिपग करणारेही आहेत. एकुणात या शॉिपग फॅन्सचं म्हणणं तरी काय, त्याविषयीच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

काही वेळा एखादी गोष्ट जस्ट आवडली म्हणून घेते. कपडे खरेदी करायला मला खूप आवडतं. कधी छोटेसे कानातले किंवा इतर वस्तू घेऊनही बरं वाटतं. त्या नेहमीच वापरल्या जातात असं नाही. हे जस्ट फॉर अ चेंज असतं. त्यानं मला छान वाटतं. काही वेळा नवीन वस्तूंची खरंच गरज असते. पण अनेकदा मी ठरवूनच शॉिपग करते. खरेदी केल्यावर माझे दोन-चार दिवस खुशीत जातात.
– प्रज्ञा मिरगळ
 
मी कधीही क्रेडिट कार्डनं शॉिपग करायला जात नाही. मी फॅन आहे शूज नि ड्रेसेसची. एकदा मी चांगले मिळाले म्हणून १२ शू पेअर्स माझ्या ड्रेसवर मॅच होतात म्हणून एकदमच घेतले होते. तेव्हा घरच्यांनी मला वेडय़ात काढलं होतं. पण माझ्या मनाला समाधान वाटलं होतं. परदेशात गेल्यावरही मी शूजचीच खरेदी केली होती. खूपदा काही कपडे नि महागडे कॉस्मॅटिक्स तसेच पडून राहिल्येत. पण मी ते वाया जाण्यापेक्षा वेळीच देऊन टाकले. मी मूड िस्वग्जनुसार शॉिपगला जात नाही. त्यासाठी माझ्याकडं दुसरा विरंगुळा असतो. मी शॉपोहोलिक नाहीये. निघाले नि बजेट बाहेरची वस्तू विकत घेतली, असं माझ्या बाबतीत होत नाही.
– अनघा सग्गर
 
शॉिपग करायला खूपच आवडत असल्यानं तेव्हा मी खूपच एक्सायटेड असते. पण असं नाहीये की, मी खूप काही घेते. पण मला आवडलं तर मी नक् की घेते. क्वचितच असं होतं की, मी कुणाबरोबर त्यांच्या शॉिपगला गेले नि एखादी गोष्ट मला आवडली म्हणून मी घेतली. माझ्या शॉिपगच्या वेळी माझ्यासोबत असलेल्यांनी सांगितल्यानुसार मी एखादी गोष्ट घेत नाही. तर मला आवडेल तेच घेते. मूड बिघडला असेल तर शॉिपग करण्यापेक्षा गप्पा मारून रिलॅक्स व्हायला आवडतं. रस्त्यानं जाता-येताना किंवा िवडो शॉिपग करताना कलरफुल मार्केटमधल्या वस्तूंचे रंग बघून समाधान वाटतं. वाटतं की, हे लाइफ एवढं कलरफुल आहे तर आपलं लाइफही कलरफुल असेल नि आहेच..
– स्नेहल पानवलकर

मी काही ठरवून शॉिपगला जात नाही. ऑफिसमधून येता-जाता कधी वाटलं तर खरेदी करते. असं म्हणतात की, आपणच आपल्याला बक्षीस द्यावं. कारण आपण स्वत:वर प्रेम केलं तर दुसऱ्यावर करू शकतो. सुट्टीच्या दिवशी मी कामाची लिस्ट काढते. ती कामं पूर्ण झाली की मी शॉिपगला जाते. मोठी खरेदी पटकन क्वचितच होते. इतरांसोबत शॉिपगला गेल्यावर काही आवडलं तर घेते. मी िवडो शॉिपग करत नाही. मला दुसऱ्यांसाठी खरेदी करायला फार आवडतं. त्यासाठी काही निमित्तच असलं पाहिजे असं नाही. कारण एखादी वस्तू कुणाला आवडेल, सूट होईल ते मला माहीत असतं. त्यामुळं ती खरेदी करून ती त्या व्यक्तीला देते.
मथिली जोशी    
viva.loksatta@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shopping mood feel good