scorecardresearch

Premium

टेस्टी टेस्टी : चटक मटक

मासे म्हटल्यावर आम्हा खवय्यांच्या तोंडास पाणी सुटतं आणि मग वीकएंड किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही धाव घेतो कोकणात किंवा गोवा, केरळच्या दिशेने.. तिथे आमचा कार्यक्रम म्हणजे सकाळ-संध्याकाळ ताजे मासे खाणे आणि उरलेला वेळ मिळेल तेव्हा फिरणे.

टेस्टी टेस्टी : चटक मटक

मासे म्हटल्यावर आम्हा खवय्यांच्या तोंडास पाणी सुटतं आणि मग वीकएंड किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही धाव घेतो कोकणात किंवा गोवा, केरळच्या दिशेने.. तिथे आमचा कार्यक्रम म्हणजे सकाळ-संध्याकाळ ताजे मासे खाणे आणि उरलेला वेळ मिळेल तेव्हा फिरणे. बरोबर ना मंडळी?
या आठवडयात मस्त फिश फ्राय रेसिपीज देतो. कुठे जायला वेळ मिळो न मिळो, पण घरच्या घरी हे पदार्थ करायला वेळ ठेवा बरं का!  

सुरमई मसाला फ्राय  
साहित्य : सुरमई, कडीपत्ता, काश्मिरी मिरची, धणे, जिरे, बडीशेप, काळी मिरी, लसूण, आले, चिंचेचा कोळ, ओवा.
कृती : आले- लसूणची पेस्ट बनवून ती सुरमईच्या तुकडय़ांना लावून ठेवावी. मसाल्याचे साहित्य एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. तव्यामध्ये दोन चमचे तेल घ्यावे. नंतर त्यामध्ये कडीपत्त्याची पाने आणि वाटलेला मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये १ वाटी पाणी टाकावे. चवीनुसार मीठ घालावे. तयार झालेल्या मिश्रणात सुरमईचे तुकडे घालावेत आणि मसाल्याचे पाणी सुकेपर्यंत मंद गॅसवर ठेवावे. सुरमई तुकडे प्लेटमध्ये ठेवून बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकावी.

बोंबील भजी
साहित्य : बोंबील, लसूण, आले, हळद, तिखट, मीठ, लिंबू, चण्याचे पीठ, तांदूळ पीठ, मैदा, अंडे, तेल, चिंचेचा कोळ, रवा, तांदूळ पीठ.
कृती : प्रथम बोंबील चिरून त्याचा काटा काढून त्याचे दोन-दोन तुकडे करून घ्या. आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे. तांदूळ पीठ, चण्याचे पीठ, मैदा, हळद, मीठ, चिंचेचा कोळ, अंडय़ाचा पिवळा बलक एकत्र करून त्यांचे एकजीव मिश्रण बनवावे. तयार केलेले मिश्रण बोंबीलला लावावे. रवा व तांदळाचे पीठ एकत्र करून मिश्रण लावलेले बोंबील त्यामध्ये घोळवून ५ ते ७ मिनिटांकरिता फ्राय करावे.

कोलंबी तवा फ्राय
साहित्य : मध्यम आकाराची कोलंबी, लसूण, आले, हळद, हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, चण्याचे पीठ, तांदूळ पीठ, मैदा, अंडे, तेल, चिंचेचा कोळ, मीठ.
कृती : मध्यम आकाराची कोलंबी साफ करून घ्यावी. आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे व कोलंबीला लावावे. तांदूळ पीठ, चण्याचे पीठ, मैदा, हळद, मीठ, चिंचेचा कोळ, अंडय़ाचा पिवळा बलक एकत्र करून त्यांचे एकजीव मिश्रण बनवावे. तयार केलेले मिश्रण कोलंबीला लावावे. तव्यामध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये मिश्रण लावलेली कोलंबी तांदळाच्या पिठात घोळवून ५ ते ७ मिनिटांकरिता फ्राय कराव्यात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tasty tasty

First published on: 07-12-2012 at 03:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×