सोशल न्यूज डायजेस्ट : शुभेच्छांचा पाऊस

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण

सोशल नेटवर्किंग साइट्

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

‘मार्च फॉर इंडिया’ नि बिहार निवडणुका
देशात सहिष्णुतेचं वातावरण कायम असल्याचं सांगत पुरस्कार परत करणाऱ्यांविरोधात अभिनेते अनुपम खेर यांनी राष्ट्रीय संग्रहालयापासून राष्ट्रपती भवनापर्यंत ‘मार्च फॉर इंडिया’ काढला. या मार्चमध्ये दिग्दर्शक मधुर भांडारकरही सहभागी झाला होता. या मार्चची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. या मार्चमधलं खेर यांचं भाषण, त्यात पत्रकाराला झालेली धक्काबुक्की, त्याबद्दल खेर यांनी मागितलेली माफी अशा अनेक मुद्दय़ांवर ही चर्चा नेटकरांत रंगली होती.
यंदाचं दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन रंगणार ते बिहारमध्ये. बिहारमधल्या निवडणुकांत नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसच्या ‘महागठबंधन’ला घवघवीत यश मिळालं. या निकालादरम्यान आणि नंतर सोशल मीडियावर #बिहार निवडणूक, #महागठबंधन, #नितीशकुमार, #नितीशडिफिटसमोदी, #बिहार रिटर्न्‍स आदी हॅशटॅग टॉप ट्रेण्डमध्ये होते. फेसबुक, ट्विटरसह सोशल मीडियावर नेटकरांनी या निकालावर बोचऱ्या शब्दांत कॉमेंट केल्या. त्यात भाजपच्या पराभवापासून ते अडवाणींना नितीश कुमारांचं बर्थडे गिफ्टपर्यंत आणि पुढचा पंतप्रधान बिहारी असेल या अंदाजापासून ते ‘लालू – नाम क्या हैं तुम्हांरा, पेले- हम पेले हैं. लालू – हम भी पेले हैं ११ बार, पर नाम तो बताओ..’ असे मेसेजेस फॉरवर्ड होत होते. ‘गाय’, ‘चारा’, ‘बिहारी’, ‘लालू’, ‘पराभव’, ‘विजय’, ‘मोदी’, ‘राहुलबाबा’, ‘काँग्रेस’ या शब्दांवर सर्वाधिक कोटय़ा केल्या गेल्या.

सोशली अ‍ॅक्टिव्ह
तरुणाई केवळ फन अ‍ॅण्ड फाइन म्हणत दिवाळी सेलिब्रेट करण्यात रंगलेली नव्हती. तर दिवाळीदरम्यान होणारं प्रदूषण लक्षात घेऊन ते टाळण्यासाठी फेसबुकवरील अनेक जागरूक पेजेसनी नेटकरांना आवाहन केल्याचं दिसत होतं. #इकोफ्रेंडली दिवाळी, #रांगोळी (नॅचरल-ऑरगॅनिक), #से नो टू क्रॅकर्स आदी हॅशटॅगनी अशा प्रकारचं आवाहन केलं गेलं. फटाके वाजवणं टाळा, कंदील, पणत्या, रांगोळ्यांचे रंग अशा प्रकारच्या वस्तूंत पर्यावरणस्नेही घटकांचा वापर करा, असं सांगितलं गेलं. ट्विटरवरही फटाक्यांच्या आवाजानं घाबरलेल्या किंवा जखमी झालेल्या प्राणी-पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी, हे सांगितलं जातंय. विविध सामाजिक संस्थांनी अनाथालयं, वृद्धाश्रम, गरजू लोकांना मदत करून आपल्या दिवाळीच्या आनंदात त्यांनाही सहभागी कसं करून घेता येईल, असं आवाहन केलंय. त्यामुळं #शेअर जॉय असा हॅशटॅग चर्चेत आहे. दुष्काळामुळे हिंमत न हरता सहकुटुंब परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांची गोष्टही सोशल मीडियावर फॉरवर्ड होत होती.

ट्विटर्स हार्ट
करेक्ट वाचलंत तुम्ही. ‘ट्विटर’वरच्या ‘स्टार’ची जागा ‘हार्ट’नं घेतलीय. आताआतापर्यंत एखादं ट्विट आवडलं की, त्यासाठी ‘स्टार’चा सिम्बॉल वापरला जात होता. ‘ट्विटर’नं या ‘स्टार’ऐवजी ‘हार्ट’ या सिम्बॉलला पेश केलंय. ‘फेव्हरेट’ हे नाव बदलून ‘फेसबुक’सारखंच ‘लाइक’ असं नाव ठेवण्यात आलंय. या बदलावर अनेक ट्विटस् करण्यात आल्यानं #ट्विटर्स हार्ट हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डिंगमध्ये होता. जगभरातल्या युजर्सना ट्विटर वापरणं सोपं होण्यासाठी हे बदल केलेत. आपल्याला अनेक गोष्टी आवडू शकतात, त्या सगळ्याच फेव्हरेट असत नाहीत, त्यामुळं ‘हार्ट’ हा सिम्बॉल वापरला गेलाय.

फेसबुक न्यूज
फेसबुकवर ‘फेसबुक न्यूज’ हे अ‍ॅप्लिकेशन चालू होणारेय. वॉशिंग्टन पोस्ट, व्होग यांसारखे मोठमोठे मीडिया ग्रुप्स या अ‍ॅपचे भागीदार असतील. युझर्सना कोणत्याही न्यूज पब्लिशर्सच्या न्यूज फीड आणि त्यांच्याशी संबंधित नोटिफिकेशन सबस्क्राइब करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. इन्स्टंट आर्टिकल सव्‍‌र्हिस ही सव्‍‌र्हिसही फेसबुकने सुरू केलेय. त्यातून वृत्तसंस्था आपल्या बातम्या थेट प्रसिद्ध करू शकतील. या नव्या अ‍ॅपमध्ये ब्रेकिंग न्यूजचा पर्यायही असेल असा अंदाज बांधला जातोय.

फॉरवर्डेड >>
एच.एम.टी. (घडय़ाळ), अ‍ॅम्बेसीडर (गाडी), नोकिया (मोबाइल) हे सर्व गुणवत्तेत कुठंही कमी नव्हते. तरीसुद्धा आज ते बाजारात नाहीत. कारण काळानुसार ते बदलले नाहीत. म्हणूनच प्रत्येकानं काळानुसार आपला व्यवहार आणि स्वभावात बदल करायला हवेत.. Update & Upgrade… Time to Time… विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सण.. परीक्षा.. दिवेपण लागतात! फटाकेपण फुटतात!! इंल्ल िपण वाजतो!! आणि घरचे आरतीपण ओवाळतात! त्यात इंजिनीअरिंगला असेल तर होमहवनच..!!!!

कहाँ गया उसे ढूंढो.
बहती हवा सा था वो, गुजरात से आया था वो, काला धन लाने वाला था वो.. कहा गया उसे ढूंढो
हमको देश की फिक्र सताती, वो बस विदेश के दौरे लगाता, हर वक्त अपनी सेल्फी खिचता था वो..दाऊद को लानेवाला था वो.. कहाँ गया उसे ढूंढो 🙂

शुभेच्छांचा पाऊस
‘लक्षलक्ष दिव्यांची प्रभा पसरली, समृद्धीची पहाट घेऊनी, सुखकिरणांचा प्रकाश लेऊनी, आली दीपावली..’ अशा काव्यात्मक ओळींची देवघेव समस्त सोशल मीडियावर होऊन दिवाळीच्या शेकडो शुभेच्छांची देवघेव झाली. काव्यात्मक शुभेच्छांइतकंच फॉरवर्ड होत होत्या त्या इमेजेस शुभेच्छा. पणती, रांगोळी, आकाशकंदील, फराळ आदी दिवाळीची वैशिष्टय़े असणाऱ्या एकेका घटकाला शुभेच्छांचा साज चढवला गेला नि ते फॉरवर्ड करण्यात येत होते. सुरेख रांगोळ्या, फटाक्यांचे व्हच्र्युअल धमाके, टचस्क्रीनवर पेटणाऱ्या पणत्या असले एकेक भारी व्हिडीओज पाठवले जात होते. या झाल्या साध्यासरळ शुभेच्छा. पण पुणेकरांनी त्यातही वेगळेपणा शोधलाच. त्यामुळे एक पुणेरी सूचना.. (तुम्हाला पटो किंवा न पटो, सूचना देत राहणे हे पुणेकरांचे कर्तव्य आहे) साधं सरळ हॅप्पी दिवाळी, शुभ दीपावली वगैरे विश करा.. उगीच पहिला दिवा तुमच्या दारी, माती-नाती-पणती वगैरे कविता पाठवून पकवू नका.. कुणीही वाचत नाही.. असाही एक मेसेज फॉरवर्ड होत होता.

दिवाळी धमाका
दिवाळी सुरू व्हायच्या आधीच नाना प्रकारच्या सूचना नेटकर एकमेकांना करत होते. काय तर म्हणे, ‘सर्व सदस्यांना नम्र विनंती. दिवाळीनिमित्त कुणीही मिठाई, पेढे, बुंदीचे लाडू आदींचे फोटो पाठवू नयेत. त्यामुळे मोबाइलमध्ये मुंग्या घुसून मोबाइल खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यापेक्षा मिठाईचे बॉक्स घरपोच पाठवल्यास खूप बरं वाटेल. काळजीपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद!’ किंवा ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ लक्षात घेऊन त्याआडून एका मालिकेवर तिरकस बाण मारले गेले ते असे – ‘फ्लिपकार्टची नवीन टॅगलाइन, डिलिव्हरी जान्हवीच्या आधी!’ अ‍ॅडमिनवर तर सूचनांचा भडिमार होत होता. त्यातला हा एक नमुना – ‘अ‍ॅडमिनला विनंती. जे ग्रुपमध्ये रोज मेसेज करतात, त्यांनाच फक्त दिवाळीचा बोनस द्या. आणि जे मेसेज करत नाहीत, त्यांना फक्त.. टिकल्या आणि बंदुकी द्या..’ एवढंच काय, दिवाळीच्या आधी केल्या जाणाऱ्या साफसफाईवरही काही आळसोबांनी फक्त फॉरवर्ड्स करण्यात धन्यता मानली. ती अशी ‘ना इश्क में, ना जुदाई में, ना बेवफाई में हैं.. जो दर्द दिवाली की सफाई में हैं..’ शिवाय घरी केलेल्या खमंग फराळाचे फोटोज फेसबुकवर विशेषत: खादाडी-रेसिपीज स्पेशल ग्रुपमध्ये आणि इन्स्टाग्रामवर पटापटा शेअर केले जात होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Trends in social media

ताज्या बातम्या