‘सिंगल्स’चा व्हॅलेंटाइन्स डे लीना दातार,

‘व्हॅलेंटाइन्स डे’ची नुसती कुणकुण लागायचा. अवकाश अतिलडिवाळ ‘शोना’, ‘श्विटू’ नामक पाखरं कट्टय़ावर, बागेत हमखास रेंगाळताना दिसतात.

‘व्हॅलेंटाइन्स डे’ची नुसती कुणकुण लागायचा. अवकाश अतिलडिवाळ ‘शोना’, ‘श्विटू’ नामक पाखरं कट्टय़ावर, बागेत हमखास रेंगाळताना दिसतात. (बॅण्डस्टॅण्ड, सारसबागेसारखे स्पॉट्स म्हणजे प्रेमाचे अड्डेच!  तिथली परिस्थिती वेगळी सांगणे न लागे.) गिफ्ट शॉप्स, मॉल्स, कॅड बी आदी ठिकाणांना शॉपिंगचा ऊत आणि प्रेमाचं भूत चढतंय. लाजाळू पपलूंनी आपापल्या प्रियतमांचे नंबर्स मिळवण्याचा प्रयत्न जारी ठेवलाय. काही अतिउत्साही स्ट्रेटफॉरवर्ड व्यक्तिमत्त्वांनी ‘याला/ हिला या वेळी तरी कन्फेस करायचंच,’ असा निर्धारच केलाय. तर असं हे एकूण ‘प्रेमळ’ चित्र! या सगळ्यात एखाद्या सिंगल मुलाने किंवा मुलीने आम्ही ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणार आहोत, असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. कारण, हल्ली प्रेमाच्या बाबतीत न्यूट्रल झालेले मित्रमैत्रिणी एकत्र येऊन ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करताना दिसताहेत. मग त्यातल्या एखाद्याला किंवा एखादीला अद्याप कुणी आपलं मिळालेलं नसतं, रिलेशनशिपमध्ये इतक्यात पडायचंच नसतं, रिलेशनशिपमध्ये अपयश आलेलं असतं, एखादीची फसवणूक झालेली असते, कोणी एकाने ‘नकार’ पचवलेला असतो. असे हे ‘सिंगल्स’ एकत्र येऊन ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करतात. एकत्र धमाल, आउटिंग असंच हे सेलिब्रेशन. प्रेमाचा निषेध करणारे काही कट्टर अॅण्टी लवर्स ठरवून अगदी काळ्या रंगाचे कपडेसुद्धा घालतात. बाकी मस्तपैकी गप्पाटप्पा, त्यानंतर मूव्ही आणि मग लंच असं या सोहळ्याचं एकूण चित्र दिसायला लागलंय.
मुंबईच्या लोकलमध्ये नेहमीच्या लेडीज डब्यात भेटणाऱ्या मुलींचे ग्रूप्स व्ही डे साजरा करतात. बदलापूरहून सकाळी ७.५२ला निघणाऱ्या लोकलमधल्या असा एक ८-१० जणींचा ग्रुप ‘सिक्रेट सांता’च्या धर्तीवर चिठ्ठय़ा पाडून एकमेकींना गिफ्ट देणार आहे. अशीच एक न्यूट्रल कॅटेगरीतली  पुण्याची धनश्री सांगते, ‘‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी एकत्र जमायचं ठरवलं की मी माझा एक मित्र आणि मैत्रीण ट्रिपल सीट जातो. त्या दिवशी ट्रिपल सीटवाल्यांना पोलीस काहीच करत नाहीत. एक मुलगी दोन मुलं किंवा एक मुलगा दोन मुली ट्रिपल सीट गेले तर ते कॉन्ट्रोवर्शियल ठरत नाही. कारण सगळं लक्ष कपल्सवर असतं. असा गेल्या दोन-तीन वर्षांचा माझा अनुभव. या वर्षी हा आमचा हा तिसरा ट्रिपल सीट ‘व्हॅलेंटाइन डे.’’ मुंबईतल्या अशाच एका ग्रुपने खास ‘अॅण्टी लवर्स पार्टी’साठी शॉपिंग केलंय. ‘व्ही डे’च्या  रूढ संकल्पनेपेक्षा वेगळा प्रकार तरुणाई समोर आणत्येय. ‘व्हॅलेंटाइन्स डे’चा इव्हेंट होताना सण साजरा करण्याचा उत्साह हल्ली जाणवतोय हे खरं.
भक्ती तांबे -viva.loksatta@gmail.com   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Valentine day of single

ताज्या बातम्या