‘तिचे हिरवे हात’ प्रेरणादायी
दिनांक १० जानेवारीच्या व्हिवामध्ये आलेला  ‘हिरवे हात’ हा लेख खूपच प्रेरणादायी होता. अनितानं एवढय़ा लहान वयात केलेला विचार आणि तिचं काम खरंच कौतुकास्पद आहे. तिच्या पुढच्या प्रोजेक्ट्सना शुभेच्छा आणि तिचं अभिनंदन.
– राजेश उतेकर

‘रिलेशनशिप स्टेटस्’ अगदी तंतोतंत
‘व्हिवा’च्या २४ जानेवारीच्या अंकात आलेले रिलेशनशिप स्टेटस्वरचे दोन्ही लेख मला खूपच आवडले. ‘इन अ रिलेशनशिप’ आणि ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ हे लेख अनघा  पाटील आणि आरोही जावडेकर यांनी अगदी छान लिहिले आहेत, पण त्यातल्या काही मुद्दय़ांबद्दल पुन्हा लिहावंसं वाटतं. सिंगल आहे म्हणून कोणाची तरी साथ हवी, फॅमिलीव्यतिरिक्त कोणी तरी आपलं म्हणून असावं, असं वाटत होतं त्या मुलीला. मला मात्र तसं वाटत नाही. ुऋ ची गरज वाटत नाही. कारण रक्ताची नाती सोडली की, कोणतंच नातं हे पर्मनंट नसतं. नॉट इव्हन फ्रेंडशिप.
आरोहीचा लेख वाचताना माझ्या फ्रेंडची आठवण झाली, कारण त्याच्या बाबतीत असंच  घडतंय. दुसऱ्यांच्या पर्सनल लाइफमध्ये डोकावणं हे कितपत योग्य आहे? याचं मला खरंच उत्तर हवं आहे. प्रत्येकाला आपली पर्सनल स्पेस नसते का? अगदी आरोहीने लिहिल्याप्रमाणे घडतं आहे त्याच्या लाइफमध्ये सध्या. कमेंट्स पास करतोस, ऑनलाइन असतोस, पोस्ट करत असतोस पण माझे पिक्स दिसत नाहीत आणि ब्ला ब्ला ब्ला..
अजून एक.. गेल्या महिन्यात आलेला तो  ‘वेस्टर्न विरुद्ध सेंट्रल’ हा लेखसुद्धा मला प्रचंड आवडला होता. ‘वेस्टर्न’वाली व्यक्ती आणि ‘सेंट्रल’वाली व्यक्ती कशी ओळखायची याबाबत जे लिहिलं होतं ते अचूक होतं. आम्ही ट्रेननं प्रवास करताना हे अनुभवत असतो. त्याचप्रमाणे मालिकांविषयी जो लेख आला होता तोही खूपच सुरेख होता. असंच आजच्या पिढीशी रिलेटेड लेख देत जा आणि थँक यू!
–  स्नेहा देवरुखकर.

मीतचं काम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद
३१ जानेवारीच्या ‘व्हिवा’मध्ये आलेला ‘मुक्या प्राण्यांचा मीत’ हा लेख खूपच चांगला होता. मुक्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्या मीतची माणुसकी, कुठल्याही सपोर्टशिवाय त्याचं चालू असणारं अखंड काम प्रेरणादायी आहे. मीतच्या कामात मलाही मदत करण्याची इच्छा आहे.
– दीपा हाते

मीत आशरचा संपर्क
गेल्या शुक्रवारच्या ‘व्हिवा’ पुरवणीत आलेल्या मीत आशरविषयीच्या लेखाला अनेकांनी प्रतिसाद दिला आणि मीतच्या कामात त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. अशाच आशयाचे अनेक मेल्स आमच्याकडे आले आहेत. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अनेकांची मीतशी संपर्क साधण्याची ?इच्छा असल्याने त्याच्या संमतीनं त्याचा ई-मेल आयडी शेअर करत आहोत – asharmeet02@gmail.com
– टीम व्हिवा