जसराज जोशीची प्ले लिस्ट मी अगदी नियमितपणे वाचते. फॉलो करते. फार छान माहिती असते यामध्ये viva-postगाण्याबद्दल. बऱ्याचदा या सदरातून एखादं विस्मृतीत गेलेलं पण एके काळी फेव्हरेट असलेलं गीत समोर येतं आणि त्याबरोबर अनेक आठवणी जाग्या होतात. गाण्याबरोबर त्याविषयी दिलेली माहितीदेखील खूप रंजक असते. अनेक नव्या गोष्टी यामुळे लक्षात आला. ही प्लेलिस्ट बघून वीकएण्डची सुरुवात झकास होते.
-मैत्रेयी जगताप

१२ महिन्यांचा धाडसी प्रवास
गेल्या महिन्यातल्या ‘व्हिवा’ पुरवणीत (फेब्रुवारी ६) सचिन भंडारी यांचा लेख वाचला. १२ महिन्यांत १२ देश फिरण्याचा त्यांचा उपक्रम खूपच चांगला आहे. असा धाडसी बेत आखणाऱ्या सचिनचं कौतुक. या साहसी उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा! मी ६८ वर्षांची असल्याने सचिनला अनेक आशीर्वादही देते. त्यांचा प्रवास झाल्यानंतर त्याविषयीचे अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील.
-पद्मा कऱ्हाडे

शब्दसखा उपयुक्त
लोकसत्ता ‘व्हिवा’मधील शब्दसखा हे सदर खूपच चांगले आहे. उपयुक्त आहे. रश्मी वारंग यांची खुसखुशीत लेखनशैलीही भावली. एकंदर अप्रतिम लेखमालिका आहे.
-किशोर पाटील

‘व्हिवा’ पुरवणीतले लेख कसे वाटतात?  या पुरवणीत आणखी कोणते विषय तुम्हाला वाचायला आवडतील? तुमच्या प्रतिक्रिया, लेख, पत्रं खालीलपैकी कोणत्याही इ मेलवर पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये @व्हिवा पोस्ट असा उल्लेख जरुर करा.  viva.loksatta@gmail.com, viva@expressindia.com