हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.
सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा. पुढच्या वेळेचा विषय आहे- नवीन सरकारकडून माझ्या अपेक्षा. निवडणुकांचे निकाल काळजीपूर्वक बघा आणि त्यावर तुमचा विचार फोटो सह कळवा.

व्यावहारिक फॉर्म भरताना एक कॉलम असतो.. फॅमिली.. कुटुंब.. आपलं घर.. आपली माणसं! एक सॉल्लिड हॅपिनग प्लेस.. असं म्हटल्यावर आठवतात ती सध्याच्या मालिकांची शीर्षक गीतं.. त्यातली भली मोठ्ठी फॅमिली.. या मोठ्ठय़ा कुटुंबाच्या मालिका आठवायचं, कारण आहे काल १५ मे रोजी साजरा झालेला जागतिक कुटुंब दिन. आजही एकत्र कुटुंबसंस्था अस्तित्वात आहे.
हल्लीच्या मुलांना एकत्र कुटुंबाची सवय नाही, हे जेवढं खरं तेवढंच खरं हेदेखील आहे की, मोठी कुटुंब आजही सुखानं नांदत आहेत. अशा मोठय़ा कुटुंबातील तरुण मुलांना त्यांच्या फॅमिलीबद्दल बोलतं केलं. माया, आधार, एकी, शेअिरग, आश्वस्तपणा, प्रेम, आपुलकी, बॉिण्डग, फेथ अँण्ड फन अशा अनेक प्लस पॉइंटनी एकत्र कुटुंबाचं पारडं वरचढ ठरतं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी अनेकदा चांगल्या संधीसाठीही एकटं राहणं नाकारलं जातं. मोठे निर्णय सर्वानुमते विचार करून घेतले जातात. पहिल्यापासून एकत्र राहायची सवय असल्यानं मनाला आश्वस्त वाटतं. इथल्या मोकळ्याढाकळ्या वातावरणामुळं बाहेरच्यांना या कुटुंबांचं अप्रूप वाटतं. या कुटुंबातल्या तरुण सदस्यांशी बोलताना त्यांनी वापरलेला ‘आम्ही’ हा शब्द अवघ्या कुटुंबाचंच प्रतिनिधित्व करतो. कारण ते असतं एक ‘होम स्वीट होम’..

रवींद्र काळे
आम्ही आज्जी-आजोबा, आई-वडील, मी-बहीण, काका-काकू नि त्यांचा मुलगा असे नऊजण राहतो. एकत्र कुटुंबामुळं मला मिळणारा मॉरल सपोर्ट अतिशय महत्त्वाचा वाटतो. व्यवस्थापनाचे धडे आपसूकच गिरवले जातात. घरी आलेल्या सगळ्यांना किमान चहा-अल्पोपाहार दिल्याशिवाय किंवा जेवल्याशिवाय आम्ही जाऊच देत नाही. सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र ट्रिपला जातो. घरात क्वचित भांडण झालं तरीही ते मनात न ठेवता सगळे चटकन एकत्र होतात. माझी आज्जी हा आमच्या घराचा आधारस्तंभ आहे. तिच्या मायेच्या धाग्यानं आम्ही घट्ट बांधले गेलो आहोत. करिअरसाठी एकटं राहायची वेळ आलीच तर थोडेच दिवस मी एकटा राहू शकेन. कायमचं एकटं राहायला मला जमणार नाही. माझं कुटुंब म्हणजे माझ्यासाठी जणू आयपीएलची टीम.. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असली तरीही एकसंध असणारी..  

ओमकार देशपांडे
आमच्या घरात आजोबा, काका-काकू नि त्यांचा मुलगा, माझे आई-वडील नि भाऊ, मी नि माझी बायको असे नऊजण राहतो. सहा महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालंय. बायकोसाठी एकत्र कुटुंबातलं वातावरण नवीन असलं तरी तिला ते आवडतंय. आमच्याकडं सगळेजण एकत्र जमल्याशिवाय लक्ष्मीपूजन केलं जात नाही. आम्ही मित्रमंडळींसह बंगल्याच्या आवारात रंगपंचमी सेलिब्रेट करतो. ९२ वर्षांच्या आजोबांच्या स्वयंशिस्तीचा आदर्श आम्हाला फॉलो करावासा वाटतो. ते आमच्या वाढदिवसाला पाकीट देऊन आमचं कौतुक करतात. त्यांनी स्वत:च्या झोपेचं वेळापत्रक बदलून आमच्याशी गप्पा मारून झोपायचा शिरस्ता ठेवलाय. पशांपेक्षा मला माझं कुटुंब महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं मी करिअरमध्ये संधी मिळाल्यास एकटा राहणार नाही. माझं कुटुंब म्हणजे माझ्यासाठी एकी, संस्कार, बॉिण्डग.. एव्हरीिथग..

सायली परांजपे
आमच्या घरात आजी-आजोबा, आई-बाबा नि मी, काका-काकू नि त्यांची दोन मुलं आणि आईची आई असे दहाजण राहतो. आई-बाबांच्या जॉबमुळं मी आजी-आजोबांजवळच वाढले. त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार नि आजीच्या हातच्या स्वादिष्ट पदार्थाची चव कधीही न विसरता येण्याजोगी.. त्यांच्याशी आपसूकच झालेल्या बॉिण्डगमुळं ते आमचे फ्रेण्डच झालेत. आम्ही त्यांच्याशी खूप गोष्टी शेअर करतो. आम्ही सहलीला वगरे कायम एकत्रच जातो. वाढदिवसांचं सेलिब्रेशनही एकत्रच करतो. करिअरसाठी म्हणून परदेशात एकटं राहावं लागलं तर मी जाईन खरी, पण हे एकटं राहणं मला खूप कठीण जाईल. आम्हाला निर्णयस्वातंत्र्य देताना घरच्यांचा त्यांनी केलेल्या संस्कारांवरचा ठाम विश्वास नकळतपणं जाणवतो. माझी फॅमिली म्हणजे माझ्यासाठी फ्रेण्ड, गाईड, फिलॉसॉफर..   

समृद्धी जोशी
आमच्या घरी आजी-आजोबा, आई-बाबा, बहीण-मी आणि काका-काकू, त्यांचे दोन मुलगे असे दहाजण एकाच इमारतीत वर-खाली राहतो. सणवार नि इतर छोटय़ा-छोटय़ा गोष्टींच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही नेहमी एकत्र येतो. आजी-आजोबांच्या सहवासात त्यांच्या जमान्यातल्या आठवणी ऐकताना खूप मज्जा येते. ते आम्हाला सणावारांचं महत्त्व समजावून सांगतात. आम्हा चारी भावंडांना समान वस्तू आणल्या जातात. आमच्या दीड दिवसांच्या गणपतीत आम्ही दहा दिवसांची पुरेपूर धम्माल करतो. एकत्र गप्पा-टप्पा, मनसोक्त खादाडी करत सुट्टी पुरेपूर एन्जॉय केली जाते. पुढं करिअरसाठी परदेशी जाऊन एकटं राहावं लागणार असेल, तर अशी संधी मी घेणार नाही. एखादा दिवस कुणी कामानिमित्त बाहेर गेलं तरी घरच्यांनाही चन पडत नाही. त्यामुळं त्यांच्याशिवाय राहण्याचा विचार मी करू शकत नाही.. माझी फॅमिली म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व..

वैशाली बोपर्डीकर
आमची १६ जणांची मोठ्ठी फॅमिली आहे. मी, बाबा, भाऊ, तीन काका-काकू नि त्यांची मुलं. एकाच मजल्यावर आमची तीन घरं आहेत नि चौथे काका हाकेच्या अंतरावरच राहतात. जेवणापासून ते सणावारांपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र करतो. चुलत बहीण माझी बेस्ट फ्रेण्ड आहे. आम्हा भावंडांचं शेअिरग-बाँडिंग खूप छान आहे. पाच वर्षांपूर्वी माझी आई गेल्यावर काकूंमुळं मला आईची कमी जाणवली नाही. माझं शिक्षण चालू राहिलं. घरातलं कधी एवढं करावं लागलं नाही. आम्ही शक्यतो सगळ्यांसाठी एकत्र जेवायला थांबतो. आजी-आजोबांकडून मिळालेले संस्कार नि वडीलधाऱ्यांच्या एकीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. करिअरसाठी कायमस्वरूपी एकटं लांब राहायची वेळ आल्यास मी ती संधी स्वीकारणार नाही. कारण माझ्या कुटुंबाला सोडून मी राहू शकणार नाही. पुढं लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायला मला आवडेल. माझं कुटुंब म्हणजे माझ्यासाठी जणू माझाच एक भाग.. जणू शरीर नि आत्मा. ते वेगळं करता येतच नाही..

नम्रता दुर्वे
आमच्या घरात चार भाऊ नि त्यांची कुटुंब एकत्र राहतात नि तीन भाऊ जागेअभावी वेगळे राहतात. चार एकत्र भावांपकी माझे वडील नि काका गेले. माझी आजी, दोन काका, तीन काकू, आई, बहीण, मी, लग्न झालेले तीन चुलत भाऊ-वहिन्या नि त्यांची मुलं, माझे चुलत भाऊ-बहीण अशी १९ जणांची आमची फॅमिली आहे. फार्महाऊसवर सणावारांच्या निमित्तानं आम्ही एकत्र जमतो. आमच्याकडं गणपतीपेक्षा अनंत चतुर्दशीचं मोठ्ठं सेलिब्रेशन असतं. त्या पूजेसाठी लागणाऱ्या १४ गोड पदार्थाना प्रत्येकाचा हातभार लागतो. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही एकमेकांसाठी थांबतो. माझ्या सगळ्या वहिन्या एकत्र कुटुंबातून आलेल्या नसल्या तरी त्या आमच्यात अगदी छान रुळल्या आहेत. तासन् तास रंगणाऱ्या गप्पा नि शेअिरग हा आहे आमच्या फॅमिलीचा यूएसपी. करिअरमध्ये संधी मिळणार असेल तर मी एखाद-दोन र्वष एकटीनं राहायचा विचार करेन. पुढं लग्नानंतर मला जॉइण्ट फॅमिलीतच राहायला आवडेल. दोन वर्षांपूर्वी माझे बाबा गेल्यावर मला माझ्या फॅमिलीनं दिलेला सपोर्ट खरोखरच शब्दांतीत आहे.. माय फॅमिली माय प्राइड..