सध्या बाजारात काही ठिकाणी ओले शिंगाडे दिसू लागले आहेत. शिंगाडय़ाचा समावेश फलाहारात होत असला तरी आपल्याकडे शिंगाडय़ाचे पीठ करून त्यापासून जास्त पदार्थ केले जातात. साबुदाणा आणि तांदळापेक्षाही शिंगाडा अधिक पौष्टिक असतो. शिंगाडय़ापासून केलेल्या काही खास रेसिपीज आजच्या मेन्यूकार्डमध्ये खास तुमच्यासाठी…
आपल्या भारतात शिंगाडय़ाचा उपयोग उपवासाच्या दिवशी फार मोठय़ा प्रमाणात होतो. पाण्यात होणाऱ्या फळांमध्ये शिंगाडा मुख्य फळ समजले जाते. शिंगाडय़ाची वेल पाण्यावर तरंगत राहते.  कारल्याच्या पानांप्रमाणे याची पाने त्रिकोणाकार असतात. काश्मीरमधील तलावात िशगाडय़ाचे वेल मोठय़ा प्रमाणावर होतात. शिंगाडय़ाची फळे त्रिकोणाकार असतात. या फळांवर काटय़ाप्रमाणे तीन टोके असतात. त्याच्या या शिंगांसारख्या टोकांवरूनच या फळांना ‘शिंगाडा’ हे नाव पडले असावे. शिंगाडय़ाची फळे प्रथम पाण्यात उकळून नंतर विस्तवात भाजून त्यांची टरफले काढून टाकण्यात येतात. दुधापेक्षा िशगाडय़ात २२ टक्के खनीज क्षार जास्त असतात. शिंगाडे अत्यंत पौष्टिक व पचायला थोडे जड असतात. िशगाडे आतून पांढऱ्या रंगाचे असतात. फलाहारात त्याची गणना होते. तरीही शिंगाडे सुकवून त्याचे पीठ करण्यात येते. त्या पिठापासून पुऱ्या, दशम्या, लाडू, शिरा, कढी व इतर अनेक पदार्थ बनवले जातात. िशगाडय़ाच्या पिठाची खीर खूपच स्वादिष्ट बनते व िशगाडय़ाची भाजीही केली जाते. सुकलेल्या िशगाडय़ाचे पीठही पचण्यास हलके व आजारी माणसांनाही मानवणारे असते. शिंगाडे मांसवर्धक असल्याने दुर्बल व शक्तिहीन झालेल्या लोकांसाठी ती अत्यंत उपयुक्त असतात. जेवणात त्यांचा उपयोग सढळपणे केल्यास शरीराला पुरेसे पोषण मिळते. िशगाडय़ांमुळे शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात व शरीराची झीज होण्याचे बंद होते. शास्त्रीय मताप्रमाणे, िशगाडय़ात प्रोटीन, चरबी, काबरेहायड्रेट, फॉस्फरस, चुना, खनिज घटक, लोह, जीवनसत्त्व ‘ए’, स्टार्च व मँगेनीजचे प्रमाणे पुष्कळ असते. शिंगाडय़ापासून तयार होणाऱ्या रेसिपीज्..

शिंगाडय़ाची भाजी
साहित्य : शिंगाडे १५ ते २० नग (बाजारालीत काळे उकडलेले िशगाडे), आलं १ इंच तुकडा, लसूण १० ते १५ कळय़ा, हिरवी मिरची चवीनुसार, कोिथबीर अर्धी वाटी, ओले खोबरे अर्धी वाटी, हळद पाव चमचा, जिरे अर्धा चमचा, तेल २ चमचे, मीठ चवीनुसार.
कृती : आलं, लसूण, हिरवी मिरची, कोिथबीर, खोबरे वाटून घेणे. पॅनमध्ये ४ चमचे तेल घेऊन त्यात जिरे तडतडल्यावर हे वाटण घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर थोडी हळद व िशगाडे सोलून घालावे. अंगच्याच पाण्याने थोडे शिजवून भाताबरोबर किंवा गरम पोळीबरोबर वाढावे व िलबाची फोड दय़ावी.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

शिंगाडय़ाचा हलवा
साहित्य : शिंगाडय़ाचे पीठ २ वाटय़ा, साखर पाऊण वाटी, दूध १ वाटी, साजूक तूप ४ चमचे, वेलची पावडर पाव चमचा
कृती : िशगाडय़ाचे पीठ तुपामध्ये खरपूस भाजून घ्यावे. यामध्ये दूध वेगळे तापून घालावे. त्यानंतर यात साखर, वेलची पावडर, इत्यादी घालून एक वाफ येऊ दय़ावी. वरून बदामाचे काप घालून सव्‍‌र्ह करावे.

शिंगाडय़ाची सुकी भाजी
साहित्य : टरफल काढलेले शिंगाडे २ वाटय़ा, बारीक चिरलेली हिरवी मिरची १ चमचा, कोिथबीर, मीठ चवीनुसार, िलबाचा रस चवीनुसार, हळद पाव चमचा, िहग चिमूटभर, तेल.
कृती : फ्राय पॅनमध्ये तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जिर घालावे. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण, कोिथबीर घालून परतावे. त्यानंतर त्यात हळद व िहग घालून शिजवलेले िशगाडे टाकावे. चवीनुसार मीठ, साखर, िलबाचा रस घालून सव्‍‌र्ह करावे.
टीप : उपवासाची भाजी करायची असल्यास िहग व हळदीचा वापर टाळावा व २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे.

शिंगाडय़ाची शेव
साहित्य : शिंगाडय़ाचे पीठ २ वाटय़ा, मीठ, तिखट चवीनुसार, शेंगदाण्याचे तेल तळायला.
कृती : िशगाडय़ाचे पीठ, मीठ एकत्र करून त्यात दोन चमचे तेल घालावे. नंतर कोमट पाण्याने भिजवून दहा मिनिटे ठेवावे. पुन्हा चांगले मळून शेवेच्या साच्यातून शेव काढावी.

शिंगाडय़ाचं थालीपीठ
साहित्य : िशगाडय़ाचे पीठ २ वाटय़ा, साबुदाण्याचे पीठ अर्धी वाटी, हिरवी मिरची, कोिथबीर चवीनुसार, जिरे १ चमचा, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार.
कृती : सगळे जिन्नस एकत्र करून त्यात दही मिसळावे. थोडे पाणी घालून गोळा मळून घ्यावा. प्लास्टिकच्या कागदावर ठेवून त्याची पोळी लाटावी, नंतर तव्यावर नेहमीच्या थालीपीठासारखे तेल घालून भाजावे.