scorecardresearch

wear हौस: कुल समर ड्रेसेस

फ्लेअर, ए-लाइन किंवा स्ट्रेट समर ड्रेस वेगवेगळ्या स्वरूपात येतात.

उन्हाळा आला की, आपल्या वॉडरोबमधील सुटसुटीत, पेस्टल शेड्सचे कपडे डोकं वर काढू लागतात. हल्ली ट्रेण्डमध्ये असलेल्या पलॅझो, स्कर्ट्स, हॉट पँट्स असे कपडय़ांचे प्रकार आपल्याला हवेहवेसे वाटू लागतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ‘समर ड्रेसेस’. यांना डे ड्रेस, शॉर्ट ड्रेस, कॅज्युअल ड्रेस असंसुद्धा म्हटलं जातं. कोणत्याही सीझनमध्ये हे ड्रेस घातलेले चालतात, पण उन्हाळा आणि डे ड्रेसेसचं नातं इतकं घट्ट झालंय की, त्यांच्या नावाशी समर जोडलं गेलंय. या ड्रेसेसची गंमत म्हणजे, रंग, प्रिंट कोणतंही असो, तो कधीही तुमचा लुक डल, उदास जाणवून देणार नाही. त्याच्या सुटसुटीतपणामुळे लुकला फ्रेशनेस मिळतो.

फ्लेअर, ए-लाइन किंवा स्ट्रेट समर ड्रेस वेगवेगळ्या स्वरूपात येतात. विशेषत: एम्पायर लाइन किंवा बेस्ट लाइनला फ्लेअर असलेले ड्रेसेस सध्या ट्रेंडमध्ये आहे. या ड्रेसेसना रंग आणि प्रिंट्सचे बंधन तर नाहीच, पण कापडाचेही बंधन यांना नाही. त्यामुळे कॉटनबरोबरच मलमल, चायना सिल्क, क्रेप, लेस, जॉर्जेट, शिफॉन असं सुळसुळीत, हवेशीर, कमी वजनाच्या कापडांचा वापर या ड्रेसेससाठी करता येतो. कमी वजनाचे कॉटन, लिनिन, खादी कापड या ड्रेसेससाठी उत्तम.

पॅटर्नमध्येसुद्धा वैविध्य राखता येतं. अगदी सिंपल स्ट्रेट ड्रेस, बोट नेक आणि हाफ स्लीव्हचा समर ड्रेस जितका सुंदर दिसतो तितकाच लेसचं डिटेलिंग असलेला समर ड्रेस आकर्षक दिसतो. स्ट्रेट ड्रेस शिवताना थोडा ढगळ शिवणं उत्तम. बॉक्स स्टाइलचा समर ड्रेस सध्या ट्रेंडमध्ये आहे. मागच्या सीझनपासून ७०च्या दशकातील स्टाइल पुन्हा नव्या ढंगात रॅम्पवर पहायला मिळत आहे. त्यात यंदा व्हिक्टोरियन काळाचा प्रभावही डिझायनर्सच्या कलेक्शन्सवर झालेला दिसून येतोय. त्यामुळे रफल्स, शिअर गॅदरिंग केलेले ड्रेस यंदा रॅम्पवर पहायला मिळाले.

ड्रेसला फ्लेअर देण्यासाठी कटिंगवेळी जादाचे कापड घेऊन त्याला चुण्या पडल्या जातात. अनारकली ड्रेस, लेहंगा, स्कर्टमध्ये ही पद्धत प्रामुख्याने वापरली जाते. यालाच शिअर गॅदरिंग म्हणतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे या ड्रेसेसना रंग आणि प्रिंट्सचे काहीच वावडे नाही. पण सध्या ट्रेंड आहे तो, पेस्टल, न्यूड शेड्सचा. बेबी पिंक, आकाशी, लेमन यल्लो, पोपटी, गुलाबी, पेस्टल नारंगी शेड्स नक्कीच वापरून पहा. तसेच ब्लॅक अँड व्हाइट समर ड्रेससुद्धा बाजारात पहायला मिळतील. लाइट वेट डेनिम बाजारात येऊ घातलंय. त्यामुळे डेनिम ब्लू शेडसुद्धा समर ड्रेसमध्ये पहायला मिळेल.

  • या सीझनमध्ये समर ड्रेस विथ जॅकेटचा ट्रेंड चलतीत असेल. अर्थात उन्हाळा असल्याने जॅकेट कसं वापरायचं? हा प्रश्न आहेच. पण हे जॅकेट कॉटनचं ओव्हरसाइज असल्याने तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा सहज घालू शकता. जॅॅकेटऐवजी फ्लोरल प्रिंटेड ओव्हरसाईज शर्ट वापरू शकता.
  • समर ड्रेसवर न्यूड अॅक्सेसरी उठून दिसतात. न्यूड, ब्राऊन शेडची स्लिंग बॅग, शूज, नेकपीस तुमच्या वॉडरोबमध्ये हवाच. समर ड्रेस विथ कॅनव्हास शूज हा लुक सध्या गाजतोय.
  • या ड्रेसेससाठी नेहमीच्या स्ट्रेट स्लीव्ह्जऐवजी बलून स्लीव्ह्स, रफल्स स्लीव्ह ट्राय करा. विशेषत: लांब बाह्य़ या ड्रेसेसना अधिकच उठाव देतात.
  • या ड्रेसेसची उंची जितकी आखूड तितकी उत्तम. ड्रेसच्या एलीगन्समध्ये त्याची लांबी महत्त्वाची भूमिका निभावते.

 

१. तुमचं कापड वजनाला जड असेल तर ड्रेसचा फ्लो सरळ राहील याची काळजी घ्या. अर्थात असिमेट्रिक कट्स, मिक्स मॅच कॉम्बिनेशन यामुळे ड्रेसला उठाव आणता येईल.

२, ४ आणि ५. सिंपल कट आणि पेस्टल शेड्ससुद्धा या ड्रेसेसना शोभून दिसतात.

३. कॉटन जॅकेट, ओव्हरसाइज शर्ट, श्रग, हुडी, अगदी स्पोर्टी झिपर जॅकेटसुद्धा समर ड्रेससोबत एकत्र आणता येईल.

५. व्हाइट, पेस्टल कलरच्या समर ड्रेससोबत छान बॅग आणि कॅनव्हास शूज घेतले की तुमचा रॅम्प-रेडी लुक तयार.

६. रफल्स, लेस, फ्रिंजेस हे समर ड्रेसिंगमध्ये हाय लाइटर्सचं काम करतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मराठीतील सर्व Wearहौस ( Wear-haus ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cool summer dresses