रंग रसिया

तुमचा मूड आणि कपडय़ांची निवड याचं कनेक्शन सॉलिड आहे.

‘आज काय घालायचं?’ कपाट उघडल्यावर हा प्रश्न प्रत्येक मुलीला पडतो.  एखाद्या दिवशी एखादा ड्रेस डल वाटतो, दुसरा परत परत घालतोयअसं वाटतं, तिसरा चांगलाय पण आज नको ही गणितं मनोमन मांडली जातात. त्यातून एका ड्रेसची निवड होते.  हे सगळं करताना पहिल्यांदा तुमचं लक्ष जातं ते कपडय़ांच्या रंगाकडे. तुमचा मूड आणि कपडय़ांची निवड याचं कनेक्शन सॉलिड आहे. कपडय़ांचे रंग व्यक्तिमत्त्व खुलवायला मदत करतात. ‘पिवळा रंग ना, मला सूट नाही होतं,’ ‘हिरवा रंग युनिव्हर्सल आहे, प्रत्येकीला सूट होतो,’ ‘काळ्या रंगात फिगर सेक्सी दिसते,’ ही चर्चा होतेच. कपडय़ांच्या रंगानेच नाही तर प्रत्येक छटेमुळेदेखील तुम्ही वेगवेगळे दिसता. पण यात तो रंग तुम्ही कसा कॅरी करता हेही तितकंच महत्त्वाचं असतं. लेमन यलो शेडच्या ड्रेसमध्ये किंचित जाड असण्याचा भास होऊ  शकतो. पण याच शेडचा फिटेड, टक इन केलेला शर्ट आणि क्लासिक ब्लू जीन्स घाला, गळ्यात मल्टिकलर नेकपीस आणि केसाचा पोनिटेल बांधा – ए वन लुक तयार!

रोज सकाळी उठल्यावर आवरून बाहेर पडण्यासाठी तयार होताना, ‘आज काय घालायचं?’ हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तुमचा मूड आणि कपडय़ांची निवड याचं कनेक्शन सॉलिड आहे. एखाद दिवशी मूड चिडका असेल, तर भडक रंगाचा ड्रेस निवडला जातो, सकाळची सुरवात मस्त झाली असेल, तर फ्रेश रंग, झोपेत असाल तर डल शेड निवडली जाते. रंग केवळ मूड नाही तर पर्सनॅलिटीवरसुद्धा खूप परिणाम करतात. आरशात पाहताना, शॉपिंगला जाताना, मैत्रिणी, बहिणींमध्ये ‘पिवळा रंग मला सूट नाही होत,’ ‘हिरवा रंग युनिव्हर्सल आहे, प्रत्येकीला सूट होतो,’ ‘काळ्या रंगात फिगर सेक्सी दिसते,’ ही चर्चा होतेच. कपडय़ांचा रंगच नाही तर प्रत्येक शेडमुळे तुम्ही वेगवेगळे दिसता. पण यात तो रंग तुम्ही कसा कॅरी करता हेही तितकंच महत्त्वाचं असतं. लेमन यल्लो शेडच्या ड्रेसमध्ये किंचित जाडं असण्याचा भास होऊ शकतो. पण याच शेडचा फिटेड, टक इन केलेला शर्ट आणि क्लासिक ब्ल्यू जीन्स घाला. गळ्यात मल्टिकलर नेकपीस आणि केसाचा पोनिटेल बांधा. काय बिशाद जाडे दिसण्याची. एरवी फिटेड लिटिल ब्लॅक ड्रेस सेक्सी दिसत असेल, पण तेच त्याला एक्स्ट्रा घेर दिला असेल तर तुम्ही नक्कीच बल्की दिसाल. युनिव्हर्सल वाटणारा हिरव्या रंगाच्या ड्रेससाठी कोणतं कापड वापरता, हेही ठरवणं तितकंचं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं, तर कपडय़ांच्या बाबतीत रंगांची संगत महत्त्वाची असते आणि त्यांना योग्य पद्धतीने कॅरी केल्यास प्रत्येक रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या छटा दाखवतो.

लाल, पिवळा, नारंगी हे रंग उष्ण तर हिरवा, निळा हे रंग शीत मानले जातात. रंगांच्या या गुणधर्मामुळे प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार एखाद्या रंगाकडे आकर्षित होतो. पटकन राग येणारे, आग्रही वृत्तीच्या लोकांकडे उष्ण रंगाचे कपडे अधिक असतात. तर शांत स्वभावाच्या व्यक्तींकडे शीत रंगाचे कपडे अधिक असतात. ही निवड अगदी आपसूक होते. अर्थात आपल्या स्वभावावरून आपण दुसऱ्या गटातील रंग निवडूच नये, असं रंगांच्या बाबतीत अजिबात नसतं. उलट एखादा रंग तुम्ही कसा आपलासा करता, यात खरं कौशल्य असतं. सिंगल कलर ड्रेसिंग असो किंवा मल्टिकलर तुम्ही रंगाची निवड कशी करता, हे तपासणं गरजेचं असतं.

१) वन पीस ड्रेस, जम्पसूट, गाऊनचे रंग निवडताना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सूट होणाऱ्या गटातील रंगाची शेड निवडा. सिंगल कलर ड्रेसिंग असल्यामुळे, तोच रंग फोकसमध्ये असतो. त्यामुळे विरुद्ध गटातील रंग निवडल्यास अवघडलेपणा येऊ  शकतो. उष्ण गटातील व्यक्ती हिरवा, निळ्या रंगाच्या गडद शेड्स आणि शीत गटातील व्यक्ती लाल, पिवळा, नारंगी रंगाच्या फिकट शेड्स छानपैकी कॅरी करू शकतात. त्यामुळे रंगांचे पर्याय वाढतात.

२) बेसिक ब्लू जीन्स सर्व रंगांवर खुलून दिसते, असं म्हणतात. पण तुमच्या स्किनटोनला ब्लूची कोणती शेड शोभून दिसते, हे तपासणं गरजेचं आहे. तुमच्या मांडय़ा जाड असतील, तर डार्क जीन्स निवडा, तेच पाय आखूड पण बारीक असतील, तर लाइट ब्लू शेड उत्तम असते. जीन्ससोबत सगळे रंग जुळून येत असले, तरी त्याचं पेअरिंग कसं करता, हेही महत्त्वाचं असतं. लाइट शेड जीन्ससोबत पेस्टल शेडचा टॉप लुकला एकसुरीपणा देतो. अशा वेळी टॉपच्या कॉन्ट्रास रंगाचा स्कार्फ, श्रग किंवा नेकपीस लुकला उठाव देतो. डार्क शेड जीन्ससोबत अर्दी टोन्सचा टॉप घालणं टाळाच.

३) काही कॉम्बिनेशन्स दिसायला चुकीची वाटत नाहीत, पण स्मार्ट ड्रेसिंगचा विचार केल्यास चुकीचे ठरतात. कुर्त्यांसोबत लेगिंग निवडताना बऱ्याचदा परफेक्ट शेड वॉडरोबमध्ये असेलच असे नाही. मग त्यातील लाइट किंवा डार्क शेड निवडली जाते. बऱ्याचदा काळी किंवा सफेद लेगिंग घालून वेळ निभावली जाते. त्याऐवजी न्यूड शेडची लेगिंग वापरा. न्यूड शेड लेगिंग्जमध्येही रंग निवडताना तुमच्या स्किनटोनपेक्षा गडद रंग निवडा.

४) पांढरा रंग डार्क शेड्सना फोकसमध्ये आणतो, तर फिकट रंगांसोबत वापरल्यास स्वत: फोकसमध्ये येतो. काळा रंग नेमका याच्या उलट वागतो. त्यामुळे यांच्यासोबत पेअिरग करताना ही बाब लक्षात घेतली पाहिजे. याच कारणाने व्हाइट शर्ट आणि ब्लू जीन्स क्लासिक कॉम्बिनेशन मानलं जातं. पेअर शेपच्या व्यक्तींनी जीन्स, स्कर्टमध्ये पांढरा रंग वापरणं टाळा.

५) फॉर्मल्ससाठी कलर कॉम्बिनेशन निवडताना कधीही जास्त कॉन्ट्रास्ट ड्रेसिंग निवडू नका. ते एटिकेटला साजेसं दिसत नाही. या ड्रेसिंगमध्ये एखादा न्यूट्रल शेड आणि त्याला जुळून येणारा रंग निवडावा. लाल, पिवळा हे उष्ण गटातील रंग पटकन नजरेत भरतात, त्यांच्याऐवजी शीत गटातील रंग फॉर्मल्ससाठी निवडावेत. उष्ण रंग वापरायचे झाल्यास लेअिरगच्या मदतीने त्यांचा उठाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

६)डार्क शेड्समध्ये स्लिम दिसतो आणि फिकट शेड्समध्ये जाड दिसतो, हा समज सरसकट सगळ्या ड्रेसिंगला लावला जातो. पण पेस्टल शेडच्या टय़ुनिकसोबत ब्राइट पण कॉन्ट्रास्ट स्कर्ट किंवा पँट वापरल्यास तुम्ही उंच दिसता. डार्क शेड्ससोबत न्यूट्रल रंगांचं कॉम्बिनेशन स्मार्ट दिसतं. –

मृणाल भगत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daily wear fashion tips

ताज्या बातम्या