गायत्री हसबनीस

लग्नसराईचा माहौल हा आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरूच राहणार आहे. एकंदरीत गेल्या चार—पाच महिन्यांत झालेले लग्न सोहळे पाहिले तर ते बरम्य़ापैकी खर्चीक आणि चैनी पद्धतीचे होते. करोनानंतर उत्साही मंडळी लग्नासाठी होऊ दे खर्च मूडमध्ये आहेत हे यावरून सिद्ध होते आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लग्नसराईची अशी धामधूम सगळीकडे पहायला मिळणार यात काही शंका नाही. त्यातही वधू आणि वराची मोठी लगबग सुरू असते ती लग्नासाठीच्या पोशाखाची.. ऑनलाइन बाजारहाट केली काय किंवा ऑफलाइन केली काय, नामवंत ‘ब्रॅण्ड्स’ हे लग्नसराईसाठी विशेष कलेक्शन्स घेऊन आले आहेत. परदेशातील फॅशन ब्रॅण्ड्सचा मागोवा घेत आपल्याकडील मंडळी तिकडच्या लेबल्सचे कपडेही लग्न सोहळ्यांकरता मागवू लागली आहे. लोकल मार्केटमध्येही खास लग्नासाठी भारी पद्धतीचे फॅशन गार्मेंट्स उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे सगळीकडेच लग्नसराईच्या खरेदीचे अनेक पर्याय असल्याने आनंदाने खर्च करू पाहणारम्य़ांना यंदाच्या वेडिंग सीझन फॅशनची मजा लुटता येणार आहे.

Surya Mangal Yuti
मार्चमध्ये ‘या’ राशींचे अच्छे दिन? १८ महिन्यांनंतर सूर्य-मंगळाची युती होताच लक्ष्मी येऊ शकते दारी
houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री
Leap Year Interesting Facts in Marathi
Leap Year 2024 : फेब्रुवारी महिन्यात २८ किंवा २९ दिवस का असतात? हे आहे कारण…
Leap Year Interesting Facts in Marathi
Leap Year 2024 : २९ फेब्रुवारी लीप इयर निमित्त काही वैज्ञानिक माहिती; लीप इयर बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

लग्नाचा पेहराव आणि पेस्टल रंग यांचं जणू घट्ट नातंच होऊन बसलं आहे. खरं तर इतर कुठल्याही फॅशनप्रमाणे वेडिंग फॅशनचे ट्रेण्ड्सही सातत्याने बदलत असतात. मात्र विराट—अनुष्काच्या लग्नापासून प्रामुख्याने सुरू झालेला हा पेस्टल रंगाच्या पेहरावाचा ट्रेण्ड अजूनही टिकून आहे. त्यामुळे पेस्टल रंगातील पेहरावालाही अजूनही तेवढीच मागणी आहे. तरीही फॅशनमध्ये बदल हवाच, मग बदलाचा हा ध्यास कुठून तरी आपला मार्ग शोधून काढतोच. तसं यंदाही झालं आहे. हल्लीच्या लग्न सोहळ्यांमध्ये लग्नाच्या महत्त्वाच्या विधींबरोबरच मेंदी, संगीत आणि इतर छोटय़ा—मोठय़ा सोहळ्यांची रेलचेल असते. गेल्या काही महिन्यांत झालेल्या सेलिब्रेटींच्या लग्न सोहळ्यांवर नजर टाकली तर त्यात संगीत— मेंदी या सोहळ्यांसाठी गडद रंगाचे पोशाख आणि मुख्य विधीसाठी पेस्टल रंगातील पोशाख अशी तयारी केलेली दिसते. हल्ली लग्न सोहळ्यांचे मुख्य आकर्षण असते ते सप्तपदी. यासाठी पेस्टल रंगामध्येही पूर्वी जे फक्त लाल आणि गुलाबी रंगाचे वेड होते ते कमी झाले आहे. त्याऐवजी जांभळा किंवा पिवळा अशा रंगातील छटांची प्राधान्याने निवड केली जाते आहे. त्यातही खास सप्तपदीसाठी वधूने लाल रंगाचा पोशाख केला असेल तर वर सफेद रंगातील पोशाख निवडून रंगसंगती खुलवताना दिसत आहेत.

टॉप ट्रेण्ड्स

फॅशन डिझायनर्सच्या म्हणण्यानुसार यंदा सस्टेनेबल फॅशनला अधिक वाव मिळणार आहे. त्याचबरोबरीने लाल रंगातील लेहंगा आणि चोळी हा लग्नपोशाख टॉप ट्रेण्डवर आहे. वधू पारंपरिक लेहंग्याला अधिक प्राधान्य देताना दिसते आहे. डिझाइन्समध्ये मिनिएचर नक्षीवर भर दिसून येतो आहे. तर एकंदरीतच वधू—वरांच्या वैयक्तिक आवडीचा प्रभाव हा लग्नसराईतील पेहरावावर दिसून येईल, असे डिझायनर्सचे म्हणणे आहे.

वधू पोशाख

वधूसाठी यंदा खास आकर्षण आहे ते भरजरी दुपट्टय़ाचं. लेहंग्याला साजेसा असा दुपट्टा तसेच चोळी यांची निवड करणं शक्य आहे. अर्थात ज्यांना पारंपरिक लाल रंगातील लेहंगा—चोली हवी आहे त्यांना रंगसंगतीचा विचार करण्याची गरज नाही. मात्र थोडासा हटके विचार करायचा असेल तर विविध रंगसंगतीचे लेहंगा—चोळी आणि दुपट्टा तुम्ही परिधान करू शकता. दुपट्टय़ाच्या काठालाही खूप वैविध्यपूर्ण नक्षीकाम केलेले तुम्हाला पाहायला मिळतं, कारण फक्त प्लेन डिझाइन्सच्या भरजरी ओढण्या, निदान लग्नात तरी डोक्यावरून घेणं वधूला फारसं रुचत नाही. त्यातही त्यांना काही तरी कल्पक डिझाईन्स हवे असतात. उदाहरणार्थ, विरुद्ध रंगच्छटा असलेले ओढण्यांवरील काठ, ओढण्यांवरील लटकन, वेल्वेटचे काठ, सोन्याचे काठ, भरलेले नक्षीदार काठ, गोटा किंवा टस्सेलचे काठ, फ्रिल काठ इत्यादी वेगवेगळे प्रकार सध्या पाहायला मिळतात. क्रेप, जॉर्जेट, झारी, शिफॉन, ऑरेगंजा, चिकनकारी अशा विविध फॅब्रिक्सच्या दुपट्टयांवर या नानाविध प्रकारातील काठ सजवलेले असतात. लेहंग्यासाठीही ऑरेगंजा, नेट एम्ब्रॉयडरी, बनारसी सिल्क, जॉर्जेट, सेमी स्टिच, पॅनेल्ड (खरं तर पॅनेल्ड लेहंगे आणि मल्टिकलर लेहंगे थोडय़ाअधिक प्रमाणात वेगळे असतात तर खरेदी करताना याची काळजी घ्यावी), सेमी एम्ब्रॉयडरी, गोटा वर्क, झारी वर्क, मिरर वर्क, फ्लोरल प्रिंट, व्हाईट एम्ब्रॉयडरी, मोती वर्क असे हरएक प्रकार तुम्हाला मिळतील. लेहंग्याऐवजी कांजीवरम साडय़ांचा पर्यायही तुम्हाला खुला आहे ज्यावर कमरपट्टा, गजरा आणि सोन्याचे दागिने परिधान करून एक वेगळा लुक मिळेल.

वर पोशाख

वर पक्षाला फॅशनमध्ये खूप सारे बदल अनुभवता येत नसले तरी वैयिक्तक किंवा कस्टमाईज्ड फॅशन आणि हॅण्डमेड कपडय़ांना त्यांच्याकडून अधिक प्राधान्य दिलं जाईल, असा अंदाज फॅशन डिझायनर्सनी व्यक्त केला आहे. फॅशन डिझायनर कुणाल रावलच्या माहितीनुसार ऑलिव्ह, डीप वाईन, डीप चारकोल्स, लेमन आणि पेस्टल हे कलर पॅलेटमध्ये पाहायला मिळतील. शेरवानी आणि जॅकेटचा ट्रेण्ड या लग्नसराईत दिसेल, त्याचप्रमाणे एम्बलिश्ड दुपट्टय़ाची मागणी वर पक्षाकडूनही होताना दिसते. याशिवाय, त्यांच्या वेडिंग फॅशनमध्ये मोजडी, फेटा, ब्रुच आणि गळ्यातील एक्सेसरीजवर जास्त भर दिलेला पाहायला मिळतो. यातही मोजडीमध्ये पांढरम्य़ा रंगाची फॅशन आहे, त्यावर उठावदार नक्षी हवीच. दुहेरी रंगातील फ्लोरल नक्षी मोजडीवर अवतरलेली दिसेल. मोजडीपेक्षा जूती आणि लॉफर्सही तूम्ही परिधान करू शकता. या चपलांमध्ये फिकट रंग असले तरी एम्ब्रॉयडरी गडद रंगात असते. फेटय़ामध्येही यंदा ब्राईट रंग ट्रेण्डमध्ये आहेत, त्यातही केशरी रंग खूप उठावदार दिसतो. वेडिंग सीझनला सप्तपदीच्या वेळी वरासाठी पांढरम्य़ा शेरवानीवर ब्राईट रंगाच्या फेटय़ांचा ट्रेण्ड फॉलो होताना दिसतो आहे. इतर फिकट रंगावरदेखील ब्राईट रंगाचे फेटे सूट होत आहेत, पिस्ता कलरच्या शेरवानीवर गडद केशरी किंवा लाल रंगाचा फेटा घालून खांद्यवर मल्टिकलर किंवा कॉन्ट्रास्ट दुपट्टा घेतला तर मस्त रॉयल लूक मिळतो. फेटय़ांमध्ये कलगीतुरा असावा ही हल्ली प्रत्येक वराची अपेक्षा असते. ब्रुचच्या बाबतीत तर हटके प्रयोग होत आहेत. डायमंड ब्रुचपेक्षा आता टस्सेल ब्रुच किंवा शिंपल्यांच्या शेलपासून बनवलेल्या ब्रुचची क्रेझ आहे. गळ्यातल्या दागिन्यांमध्ये सध्या तरी कुंदनचे दागिने अधिक दिसत आहेत. पण त्यातूनही हल्ली मुलं रॉयल लुक ठेवण्यावर भर देतात ज्यामध्ये मनारकली, फेटा, पगडी, सरपेच, मोत्यांची माळ, तलवार, मोजडी असा लुक अत्यंत आकर्षक वाटतो.

खास लग्नसोहळ्यासाठी नानाविध रंग आणि कापडाचे लोकल ते ग्लोबल पोशाख मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. सगळीकडेच लग्नसराईच्या खरेदीचे अनेक पर्याय असल्याने आनंदाने खर्च करू पाहणारम्य़ांना यंदाच्या वेडिंग सीझन फॅशनची मजा लुटता येणार आहे. काही टिप्स..

  • यंदा मास्क हा काही जाणार नाही, त्यामुळे आय मेकअपवर जास्त भर द्या. त्यातही स्मोकी आय मेकअप करा.
  • दागिने निवडताना ते कुंदन, सोनं, डायमंड, लेअर्ड नेकपीसेस, चोकर आणि गोल्डन हेवी बांगडय़ा घालायला विसरू नका.
  • मराठमोळा लुक करणार असाल तर नक्कीच शालू आणि मराठमोळ्या वजट्रिका, बाजूबंद, लक्ष्मीहार, चपलाहार, पैंजण इत्यादी सदाबहार पारंपरिक दागिने तुम्ही परिधान करू शकता. मुलंही मराठमोळी भीकबाळी, पगडी त्यावर सरपेच तसेच अंगरखा परिधान करत पेशवाई लुक कॅरी करू शकता.
  • वधूच्या हातात नानारंगी, नानाढंगी पोटल्या खास शोभून दिसतात.

viva@expressindia.com