तेजश्री गायकवाड
या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच ‘मेट गाला’ फॅशन इव्हेंटने दरवर्षीप्रमाणे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही #metgala या हॅशटॅगवर अनेक इंटरनॅशनल, नॅशनल सेलिब्रिटींच्या छायाचित्रांबरोबर झळकलेल्या पोस्ट सोशल मीडियावरती बघितल्या असतील. या पोस्ट बघितल्या की आपसूकच मनात विचार येतो की, ही अशी फॅशन का? असे चित्रविचित्रच कपडे हे कलाकार का घालतात? खरं तर यामागे अनेक कारणं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मेट गाला’ ज्याला औपचारिकपणे ‘कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूट गाला किंवा कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूट बेनिफिट’ म्हणतात आणि ‘मेट बॉल’ म्हणूनही ओळखलं जातं. न्यूयॉर्क शहरातील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूट’ला वार्षिक निधी उभा करून देण्यासाठी सुरू केलेला हा एक फॅ शन उत्सव आहे. हा रेड कार्पेट इव्हेंट कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक फॅशन प्रदर्शनाचं उद्घाटन करतो. हेच या इव्हेंटचं एक कारण आहे. चित्रविचित्र कपडय़ांमुळे सगळीकडे चर्चा होते आणि याच चर्चेचा चॅरिटीसाठी जास्त फायदा होतो. या इव्हेंटसाठी दरवर्षी एक थीम ठरवून दिली जाते आणि त्या थीमच्या आधारावर येणारे पाहुणे कपडे घालतात. यंदाच्या मेट गालाची थीम ही ‘अमेरिकन स्वातंत्र्य’ या संकल्पनेवर  आधारित होती. म्हणूनच अमेरिकन ध्वजाच्या लाल-पांढऱ्या रंगाचा वापर करत डिझाईन के लेल्या स्कर्ट आणि ‘महिलांसाठी समान हक्क’ असं लिहिलेल्या गाऊनपर्यंत मनोरंजक ड्रेस या फॅ शन जत्रेत पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the reason behind the colorful fashion lifestyle ssh
First published on: 17-09-2021 at 00:47 IST