दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने औषध विक्रेता ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. बाळासाहेब दाजीराम देसाई (वय ५०) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. बाळासाहेब देसाई हे मूळचे (सावर्डे, ता.हातकणंगले) गावचे रहिवाशी आहेत. सध्या ते इचलकरंजी येथे राहतात. रविवारी सावर्डे एका परिचिताकडे जेवणासाठी गेले होते. दुपारी दोन वाजता जेवन करून ते मित्रासह दुचाकीवरून परत येत होते. शरद साखर कारखान्याकडे जाणाऱ्या माधवनगर फाटा येथे ते आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ती इतकी जबरदस्त होती की देसाई जागीच ठार झाले. तर दुचाकीवर बसलेले जितेंद्र बाबासाहेब देसाई हे जखमी झाले.