News Flash

संगमनेरला साडेदहा, कोपरगावला साडेसहा कोटी

सुरळीत वीज वितरणासाठी कोपरगाव व संगमनेर येथे विस्तारीत उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने कोपरगावला ६ कोटी ६९ लाख रूपये व संगमनेरला १० कोटी

| February 3, 2013 01:34 am

सुरळीत वीज वितरणासाठी कोपरगाव व संगमनेर येथे विस्तारीत उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने कोपरगावला ६ कोटी ६९ लाख रूपये व संगमनेरला १० कोटी ६९ लाख रुपये मंजूर केल्याची माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.
राज्यातील वीज गळतीचे प्रमाण ३९ टक्के आहे. त्यामुळे महावितरणच्या  नुकसानीबरोबरच ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसतो.
सन २०१२ पर्यंत वीज गळती १५ टक्क्यांवर आणण्याचा वितरण कंपनीचा दावाही फोल ठरला आहे. नाही. वीज चोऱ्या पकडण्यासाठी नियुक्त  करण्यात आलेली भरारी पथकेही निष्प्रभ झाली आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वीज गळतीचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा त्रास ग्राहकांना सोसावा लागत आहे असा आरोप करुन खासदार वाकचौरे यांनी सांगितले की, वीज वितरण प्रणाली सुधारावी व गळती कमी व्हावी यासाठी आपण गेली तीन वर्षे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो. अखेर त्याला यश आले असून केंद्रीय वीज राज्यमंत्री ज्योतिरादित्य िशदे यांनी नुकतेच कोपरगाव शहर व तालुक्यासाठी ६ कोटी ६९ लाख तर संगमनेर शहरासाठी १० कोटी ६९ लाख रुपये मंजूर केले आहेत.
कोपरगावसाठी पहिल्या टप्प्यात ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर उर्वरीत ८ कोटी ६ लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. संगमनेर शहरासाठीचा निधीही दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 1:34 am

Web Title: 10 5 carod to sangamner 6 5 carod to kopargaon
टॅग : Electricity
Next Stories
1 मंगल कार्यालयांवर चोरटय़ांचा डल्ला
2 निळवंडय़ाच्या कालव्यांसाठी पुरेशा निधीची मागणी
3 यंत्रमाग कामगारांच्या आंदोलनामुळे वस्त्रनगरी ठप्प
Just Now!
X