News Flash

मोबाईल विक्री दुकानातून साडेदहा लाखांचा माल चोरीस

मिरजकर तिकटी येथील एसएस कम्युनिकेशन या मोबाईल विक्रीच्या दुकानातून १० लाख ५२ हजार रूपये किमतीचे मोबाईल हॅण्डसेट व अन्य साहित्य चोरटय़ांनी बुधवारी पहाटे लंपास केले.

| March 13, 2013 09:59 am

मिरजकर तिकटी येथील एसएस कम्युनिकेशन या मोबाईल विक्रीच्या दुकानातून १० लाख ५२ हजार रूपये किमतीचे मोबाईल हॅण्डसेट व अन्य साहित्य चोरटय़ांनी बुधवारी पहाटे लंपास केले. दुकानात असलेल्या सीसी टीव्हीमध्ये चोरटे चोरी करीत असतांना दिसत असून त्याआधारे शोध घेतला जात आहे. सुमारे ४०मिनिटात चोरटय़ांनी लूट केली असल्याचे दिसून आले आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये जावेदअब्दुलरशिद मुश्रीफ यांनी फिर्याद दिली आहे.
जावेद मुश्रीफ रा.लाईन बझार कसबा बावडा यांचे मिरजकर तिकटी येथे एसएस कम्युनिकेशन नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. बुधवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या दुकानामध्ये सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याची पाहणी पोलीस अधिकाऱ्यांनी केली. त्यामध्ये पहाटे ४ वाजून १७ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटे या कालावधीत दोघे चोरटे दुकानातील मोबाईल व अन्य साहित्य चोरून नेत असल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.    
चोरटय़ांनी मोबाईल हॅण्डसेट, बॅटरी चार्जर, हेडफोन, ब्लूटूथ, मेमरी कार्ड आदी सुमारे १० लाख ५२ हजार रूपये किमतीचे साहित्य दुकानातून लांबविले आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2013 9:59 am

Web Title: 10 5 lakh of mobiles and other things stolen from mobile shopee
टॅग : Mobiles,Stolen
Next Stories
1 राजारामपुरीत एकेरी वाहतूक; नागरिकांकडून स्वागत, व्यापाऱ्यांकडून नाराजी
2 वाई बाजारात हळदीला आठ ते पंधरा हजार भाव
3 श्वानदंश झालेल्या नगरसेवकाला अॅन्टी रेबीजऐवजी डिस्टिल्ड वॉटरचे इंजेक्शन.
Just Now!
X