शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना विभाग क्र. २ व राजेंद्र स्पोर्टस् क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चतुर्थ सुप्रीमो चषक २०१३ क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली.  स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेना विभाग क्र. २ चे विभागप्रमुख आमदार अ‍ॅड्. अनिल परब व माजी बेस्ट अध्यक्ष, नगरसेवक संजय पोतनीस यांनी जाहिरातींच्या माध्यमातून जमा केलेला १० लाख रुपये निधींचा धनादेश महाराष्ट्रातील दुष्काळग्रतांच्या मदतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.