पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघासाठी ११ कोटी ५७ लाख रुपयांची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. यावर्षी त्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नाने ही कामे मंजूर झाली आहेत, अशी माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी दिली.     
मंजूर झालेल्या कामांची माहिती देताना जाधव म्हणाले, सावर्डे-कादे रस्ता (३५ लाख), केर्ली-जोतिबारस्ता (३५ लाख), सरूड-नेर्ले रस्ता (२० लाख), नाबार्ड अंतर्गत पुल व रस्त्यांच्या कामांसाठी ४ कोटी ८१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये कडवे-करूंगळे रस्ता (९७ लाख), खुटाळवाडी-साळशी लहानपुल (८२ लाख), कडवे-निनाई रस्ता (८१ लाख), चरण-कोडोली रस्ता (६१ लाख), बांबवडे-नांदारी रस्त्यावर लहान पूल (५० लाख), बांबवडे-नांदारी रस्ता (४२ लाख), तुरूकवाडी-वारूळ रस्ता (४० लाख),रेटरे-शित्तूर रस्ता (२५ लाख).    
तेराव्या वित्त आयोगांतर्गत घोळसवडे येथे लहान पूल बांधणे (७५ लाख) व उंड्री-खोतवाडी रस्ता(३० लाख) अशी दोन कामे होणार आहेत. याशिवाय शाहूवाडी तालुक्यातील विठापेठ ते ओणी रस्ता(९० लाख), केर्ली ते नांदारी रस्ता (१ कोटी ८० लाख), बांबवडे ते नेर्ले रस्ता (३५ लाख), कळे-तिरपणपुलासाठी भूसंपादन (१५ लाख), वाघबीळ -मांगले लहान पूल बांधणे (७० लाख), निगवे-गिरोली रस्ता(४५ लाख), वाघबीळ-मांगले रस्ता (४५ लाख) आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे.