News Flash

पाडव्याच्या मुहूर्तावर परभणीत १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू

जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत नाही व तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे

| April 12, 2013 01:54 am

जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत नाही व तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे उद्घाटन पार पडले.
शहराच्या ख्वाजा कॉलनीतील टाकीवरून पाणी भरून यास प्रारंभ करण्यात आला. हे १२ टँकर १२ हजार लिटर क्षमतेचे असून शहरात एका टँकरद्वारे किमान ६० कुटुंबांना पाणी मिळणार आहे. प्रत्येक टँकरच्या दिवसभरात पाच खेपा होणार आहेत. ज्या प्रभागात जलवाहिनी नाही व विंधनविहिरी आटल्याने तीव्र पाणीटंचाई आहे, त्या प्रभागात संपूर्ण उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो, असे महापौर प्रताप देशमुख यांनी स्पष्ट केले.
प्रभाग समिती ब मध्ये पुरविण्यात येणाऱ्या टँकरचे उद्घाटन विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, तर प्रभाग समिती अ मधील टँकरचे उद्घाटन नगरसेवक दिलीप ठाकूर यांच्या हस्ते झाले. प्रभाग समिती क मधील टँकरचे उद्घाटन अतुल सरोदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती विजय जामकर होते. नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, आरोग्य सभापती गुलमीर खान, प्रभाग समिती सभापती सचिन देशमुख, विजय धरणे आदी उपस्थित होते. पाणीपुरवठा प्रभाग समितीमार्फत करण्यात येणार असून शहरातील जनतेने प्रभाग समितीशी संपर्क साधावा, अशी माहिती नगर अभियंता बाळासाहेब दुधाटे यांनी दिली. प्रभाग समिती प्रमुख मीर शाकेर अली यांनी पाणीपुरवठय़ाच्या नियोजनाबाबतची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:54 am

Web Title: 12 water tanker started on padwa occasion
Next Stories
1 ‘सरकार, विद्यापीठ, उद्योगक्षेत्राने एकत्रित काम करणे आवश्यक’
2 शहरी पाण्याची सद्य:स्थिती, आव्हानांवर उद्या चर्चासत्र
3 कालव्यात पडलेल्या मुलाचा मृतदेह सापडला
Just Now!
X