11 July 2020

News Flash

अनुदानीत गॅस सिलेंडर्स ग्राहकांना १२५ बँकांचा पर्याय

घरगुती गॅस सिलेंडर सरकारच्या अनुदानित योजनेतून मिळावा यासाठी आधारकार्ड सोबत बँकेची माहिती देणारे अर्ज देण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील गॅस

| October 5, 2013 07:40 am

घरगुती गॅस सिलेंडर सरकारच्या अनुदानित योजनेतून मिळावा यासाठी आधारकार्ड सोबत बँकेची माहिती देणारे अर्ज देण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील गॅस एजन्सींसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. ग्राहकांचे सिलेंडरसाठीचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने देशभरातील १२५ राष्ट्रीय, नागरी सहकारी, शेडय़ुल्ड व इतर बँकांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत.
विशेष म्हणजे या बँकांमध्ये डोंबिवलीतील ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ आणि कल्याणमधील ‘कल्याण जनता सहकारी बँके’चाही समावेश आहे. त्यामुळे या बँकेत खाती असलेल्या ग्राहकांना गॅस एजन्सीत आधारकार्डचा अर्ज देताना या बँकेची खाती असलेला खाते क्रमांक देणे शक्य होणार आहे, असे या बँकांच्या उदय पेंडसे, शाम चव्हाण या प्रतिनिधींनी सांगितले. सध्या काही गॅस एजन्सींमधून आम्ही फक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले आधारकार्डचे अर्ज स्वीकारतो अशी खोटी, ग्राहकांची छळवणूक माहिती देण्यात येत आहे. यावर ग्राहकांनी विश्वास ठेऊ नये, असे अनेक बँकांच्या प्रतिनिधींनी सांगितले.  ग्राहकांची परवड होऊ नये म्हणून पेट्रोलियम मंत्रालयाने त्यांच्या ‘पेट्रोलियम.एनआयसी.इन/डीबीटीआय’ या संकेतस्थळावर १२५ बँकांची यादी प्रसिध्द केली आहे. यामधील कोणत्याही बँकेत खाते असलेला गॅस ग्राहक आधारकार्ड एजन्सीत संलग्नित करण्यासाठी या बँकांमधील आपल्या खात्याचा वापर करू शकतो. प्रत्येक बँकांनी आधारकार्ड ग्राहकाच्या खात्याशी संलग्नीत करण्यासाठी ग्राहकांकडून अर्ज भरून घेतले आहेत. हे क्रमांक बँकेकडून खात्याशी संलग्नीत करण्यात येतील. गॅस एजन्सीत ग्राहकांनी भरून दिलेले अर्ज एजन्सी नोंदणीकृत करून घेईल. गॅस एजन्सी व बँक यांच्यामधील ताळमेळ साधण्यासाठी ‘एनपीसीआय’ ही एजन्सी महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे कोणीही ग्राहक अनुदानित सिलेंडर्सपासून वंचित राहणार नाही, असे काही बँक प्रतिनिधींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2013 7:40 am

Web Title: 125 bank options to subsidies gas syllinder holders
टॅग Dombivali
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय दुतावास प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत
2 नेरूळमधील ‘उत्कर्ष’च्या नवरात्रोत्सवात समाजस्नेही दानयज्ञ.!
3 मातोश्रीच्या नकारघंटेमुळे शिवसेनेत अस्वस्थता
Just Now!
X