पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे कॉलेज ऑफ फार्मसी व एआयसीटीई (नवी दिल्ली) यांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या कर्करोगविरोधी औषधांवरील दोनदिवसीय चर्चासत्रात १३४ विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले.
ज्ञानेश्वर हरदास (विखे पाटील फार्मसी, नगर) याच्या शोधनिबंधास प्रथम, तर प्रशांत आरगडे (सरकारी तंत्रनिकेतन, जळगाव) याच्या शोधनिबंधास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. चर्चासत्राचे उद्घाटन अ‍ॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट रीसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सरचे (नवी मुंबई) सायंटिफिक ऑफिसर डॉ. राजीव गुडे यांच्या हस्ते झाले. औषधनिर्मिती क्षेत्रातील विविध व्यावसायिकांनीही आपले स्टॉल्स उभारले होते.
या वेळी गुडे यांच्यासह नॅशनल केमिकल लॅबचे (पुणे) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवासा रेड्डी, औषधनिर्मिती क्षेत्रातील व्ही-लाईफ सायन्स टेक्नॉलॉजी कंपनीचे मुख्य संशोधक डॉ. सामी मुखोपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना ‘कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री इन अँटीकॅन्सर ड्रग्ज रीसर्च’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे, सचिव लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. सदानंद, संचालक डॉ. पी. एम. गायकवाड, डॉ. अभिजित दिवटे, प्राचार्य डॉ. पी. वाय. पवार, संयोजक डॉ. आर. एल. सावंत तसेच शिक्षक व औषधनिर्मिती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.