29 May 2020

News Flash

परभणीत १४ कार्यकर्त्यांना अटक

टोलविरोधात मनसैनिकांनी परभणी, सेलू, गंगाखेड, जिंतूर येथे रास्ता रोको केले. सेलू येथे रास्ता रोको दरम्यान एका बसवर दगडफेक केली. दोन घटनांमधील दगडफेकीत १४ जणांना अटक

| February 13, 2014 01:55 am

टोलविरोधात मनसैनिकांनी परभणी, सेलू, गंगाखेड, जिंतूर येथे रास्ता रोको केले. सेलू येथे रास्ता रोको दरम्यान एका बसवर दगडफेक केली. गंगाखेड तालुक्यातील इसाद येथेही बसवर दगडफेकीचा प्रयत्न झाला. सेलू येथील प्रकारात ३ प्रवासी जखमी झाले. सेलू व इसाद या दोन घटनांमधील दगडफेकीत १४ जणांना अटक करण्यात आली. जिल्हाभरात मनसेच्या २५३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात होता. जागोजागी पोलीस तळ ठोकून होते. शहरासह जिल्ह्यात मुख्य रस्त्यांवर अक्षरश छावणीचे स्वरूप आले हाते. सकाळी तणावही होता. तथापि राज यांना झालेली अटक, तसेच मुख्यमंत्र्यांनी उद्या चर्चेची तयारी दाखविल्यानंतर व खुद्द राज ठाकरे यांनीही आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. त्यानंतर जिल्ह्यात शांततेत आंदोलन पार पाडले. सेलू व गंगाखेड तालुक्यातील इसाद वगळता कुठेही दगडफेकीचा प्रकार घडला नाही. परभणी शहरात विसावा कॉर्नरवर पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंढे, विनोद दुधगावकर, सुनील देशमुख, बाळासाहेब भालेराव, श्रीमती चव्हाण यांच्यासह ३५ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
सेलू येथे रायगड कॉर्नरवर आंदोलनाला िहसक वळण मिळाले. राजावाडी पाटीनजीक सेलू-परभणी बसवर (एमएच १४ बीटी १६६१) दगडफेक झाली. दगडफेकीत बसमधील प्रवासी रेखा प्रशांत हालगे, मधुकर देविदास हलगे व संजीवनी जिजाभाऊ थोरात जखमी झाले. सेलू पोलिसांनी जिल्हाप्रमुख शेख राज, प्रभुराज तेवर, राहुल इंगळे, रंगनाथ पवार, बबू पठाण आदींसह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली. गंगाखेड तालुक्यातील इसाद येथेही बसवर दगडफेक झाल्याची माहिती पोलीस यंत्रणेने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2014 1:55 am

Web Title: 14 arrest in parbhani
टॅग Parbhani
Next Stories
1 िहगोलीत १७८ कार्यकर्ते ताब्यात
2 नांदेडात २७ ठिकाणी रास्ता रोको, जालन्यात २०० आंदोलक ताब्यात, दहा मिनिटांत आंदोलन गुंडाळले!
3 समन्यायी पाणी हक्कासाठी शेकापतर्फे रविवारी परिषद
Just Now!
X