18 September 2020

News Flash

दहीसर मोरी भागातील १४ गावांवर टांगती तलवार

सात वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेचा अविभाज्य घटक असलेली दहीसर मोरी भागातील १४ गावे आता पुन्हा पालिकेत येण्यासाठी आतूर झाली आहेत.

| July 22, 2015 07:36 am

सात वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेचा अविभाज्य घटक असलेली दहीसर मोरी भागातील १४ गावे आता पुन्हा पालिकेत येण्यासाठी आतूर झाली आहेत. मात्र, प्रशासनाने तीन अटी पुढे करून त्यांच्यावरील टांगती तलवार कायम ठेवली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन अटी घालून गावांच्या घरवापसीवर संभ्रमावस्था कायम ठेवली आहे.
नवी मुंबई पालिकेचा जिझिया कर नको, शासकीय जमीन बळकावण्यासाठी पालिकेची घुसखोरी यासारखे आरोप करून सात वर्षांपूर्वी दहीसर मोरी भागातील १४ गावांनी नवी मुंबई पालिकेशी फारकत घेतली. या सात वर्षांत या गावांचा इंचभरदेखील विकास झाला नाही. ही गावे पुन्हा नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यात यावीत म्हणून संघर्ष सुरू झाला आहे. त्यासाठी तेथील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर अनेक वेळा बैठका घेतल्या आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती पूर्वीसारखी राहिली नसल्याने आता या गावांच्या विकासासाठी सरकारने अनुदान देण्याची गरज असल्याची अडचण नाईक यांनी या ग्रामस्थांसमोर मांडली .
या अनुदानाबरोबरच नवी मुंबई दहीसर प्रवासासाठी पारसिक हिलमधून बोगदा (टनेल) व तेथील सुमारे ९०० एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून देण्याची अट ग्रामस्थांनी सरकारला घालावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे गावे समावेश करण्यास विरोध नाही, पण युती सरकारकडून सुविधा हव्यात अशी भूमिका नाईक यांनी मांडल्याने त्याची री सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी ओढली आहे. ह्य़ा मागण्या सरकारला कळविल्या जाणार असून त्यानंतरच गावे समावेश करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सरकारला ही गावे पालिकेत समाविष्ट करताना गावविकासासाठी ५०० कोटी रुपये, सुलभ दळणवळणासाठी बोगदा आणि अतिक्रमण मुक्त शासकीय जमीन याबाबत प्रथम निर्णय घ्यावा लागणार आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेत २७ गावांच्या समावेशानंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर ही गावे नवी मुंबईत समावेश करताना सरकारला पालिकेच्या मागण्या मान्य करण्याबाबत विचार करावा लागणार आहे. पािलकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असून राज्यात युती शासन आहे. त्यामुळे ही गावे पालिकेवर लादली जातात की पालिकेच्या मागण्या पूर्ण केल्या जातात हे येणारा काळच ठरविणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2015 7:36 am

Web Title: 14 villages in navi mumbai region will be include in bmc
टॅग Bmc
Next Stories
1 १५ टक्के विकसित भूखंड देण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी
2 रेल्वेस्थानक परिसरातील हत्येचे गूढ उलगडले
3 ७२ तासांनंतरही विघ्नेशच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा नाही
Just Now!
X