News Flash

तायक्वांदो चाचणीसाठी १४२ खेळाडूंचा सहभाग

जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने आयोजित भारतीय खेल प्राधिकरण मैदानात घेण्यात आलेल्या निवड चाचणीत १४२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यातून तायक्वांदोचा १४ वर्षांखालील खेळाडूंचा जिल्हा संघ निवडण्यात

| August 12, 2013 01:55 am

जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने आयोजित भारतीय खेल प्राधिकरण मैदानात घेण्यात आलेल्या निवड चाचणीत १४२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यातून तायक्वांदोचा १४ वर्षांखालील खेळाडूंचा जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन या संघटनेचे अध्यक्ष किरण सानप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल सानप, प्रसाद कुलकर्णी, महेश इंदापुरे यांची उपस्थिती होती.
१८ किलो वजन गटात आदित्यराज दानवे, हर्षल आढाव, आदर्श कराडे, देवाशिष भगत यांनी यश मिळविले तर मुलींमध्ये १६ किलो वजन गटात प्रतीक्षा फुनगे, श्रावणी कुलकर्णी, अवनी कुलकर्णी यांनी यश मिळविले. १८ ते २१ वजन गटात आयुष दानवे, सुरज तुपे, सुजय पांडे, तर मुलींमध्ये १६ ते १८ किलो वजन गटात कार्तिकी कदम, शिवानी शेळके, स्नेहा पारे, यांनी यश मिळविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:55 am

Web Title: 142 players participation perform a test for taikondo
Next Stories
1 हिशेब न दाखविणाऱ्या ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
2 पोषण आहाराबाबत शिक्षण विभागाचे, नवे परिपत्रक म्हणजे उशिराचे शहाणपण
3 उपविभागीय कार्यालयाच्या मागणीसाठी मंगळवारी लोहारा बंद
Just Now!
X