सलग दोन वष्रे दुष्काळाशी सामना करीत असतानादेखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने एक रुपयाचेही कर्ज अथवा कोणत्याही प्रकारचे अनुदान घेतले नाही. डोक्यावर कर्ज नसलेली राज्यातील एकमेव बाजार समिती असलेल्या सोलापूर कृषी बाजार समितीने मागील आíथक वर्षांत १२०० कोटींची उलाढाल केल्याचा दावा बाजार समितीचे सभापती, आमदार दिलीप माने यांनी केला.
    वार्षकि सर्वसाधारण सभा समितीच्या वि. गु. शिवदारे सभागृहात पार पडली. ही सभा अवघ्या अध्र्या तासात संपली. स्वागत प्रास्ताविकानंतर विषय पटलावरील सर्व विषय मंजूर झाले. त्यानंतर सभापती माने यांनी बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेतला. आगामी आíथक वर्षांत बाजार समितीची आíथक उलाढाल १६०० कोटीपर्यंत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाजार समितीच्या आवारात दररोज दहा हजार शेतकरी, व्यापारी, ग्राहक, वाहतूकदार, हमाल, तोलारांची ये-जा असते. या सर्वाची तहान भागविण्यासाठी शुद्ध पाण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी ५ लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येत असून त्यास आर.ओ. सिस्टिम प्रत्येक व्यापारी गाळय़ास मोफत नळ जोडणी देण्याचे नियोजन असल्याचे आमदार माने यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी दैनंदिन बाजारभाव तात्काळ समजण्यासाठी एस.एम.एस सेवाही सुरू केली जाणार आहे. समितीचा संपूर्ण कारभार ऑनलाइन करण्याचा मानसही त्यांनी बोलावून दाखविला. या सभेस उपसभापती राजशेखर शिवदारे, माजी सभापती इंदुमती अलगोंडा-पाटील, महादेव ऊर्फ तम्मा गंभीर, प्रवीण देशपांडे, सिद्धाराम चाकोते, बसवराज दुलंगे, आदी संचालक उपस्थित होते.