नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील सुमारे १७२ स्रोतांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची तृष्णा भागणार असून ५२ नसíगक पाणवठे, तर १२० बोअरवेल व कृत्रिम पाणवठे आहेत, ज्यात ४४ स्रोत हे सोलर पंपांसह आहेत.
गोंदिया जिल्ह्य़ातील वनक्षेत्रात उन्हाची दाहकता आणि पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होते. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे येतात. परिणामी, शिकारीचे प्रमाण वाढते व पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना वनविभागाने केली आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र ६५३.६७ चौरस कि.मी. क्षेत्रात व्यापलेले असून सर्वाधिक क्षेत्र गोंदिया जिल्ह्य़ातच आहे. नागझिरा, न्यू. नागझिरा, नवेगाव अभयारण्य, कोका अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान या भागात मोठय़ा प्रमाणावर वन्यप्राण्यांचा अधिवास आहे, परंतु जिभेचे चोचले पुरविण्यासाठी काही अंशी शिकारीसुध्दा टपलेले आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या अभावामुळे वन्यप्राण्यांची गावाकडे भटकंती वाढते. पाणी न मिळाल्यास प्राण्यांचा मृत्यूही होतो, परंतु यावर पर्याय म्हणून ठिकठिकाणी असलेल्या नसíगक व कृत्रिम जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. नागझिरा, नवेगाव उद्यान, उमरझरी, पिटेझरी परिक्षेत्रात उभारण्यात आलेल्या १७२ जलस्रोताच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची तृष्णा भागणार आहे. वन्यजीव विभागातून प्राप्त माहितीनुसार नागझिरा परिक्षेत्रात ४ नसíगक पाणवठे, तर ५१ बोअरवेल कृत्रिम पाणवठे असून १६ सोलरपंप आहेत. नवेगाव उद्यानात २५ नसíगक पाणवठे, तर ३४ बोअरवेल कृत्रिम पाणवठे असून ८ ठिकाणी सोलरपंप बसविण्यात आले आहेत. उमरझरी अणि पिटेझरी परिक्षेत्रात मिळून असलेल्या न्यू नागझिरा येथे १७ नसíगक पाणवठे, तर २७ कृत्रिम बोअरवेल पाणवठे आहेत. त्यात १५ ठिकाणी सोलरपंप बसविण्यात आले आहेत. डोंगरगाव डेपो आणि बोर्ड लिहून असलेल्या नवेगाव अभयारण्य क्षेत्रात १० नसíगक पाणवठे, तर २० बोअरवेल कृत्रिम पाणवठे असून ५ ठिकाणी सोलरपंप आहेत. १७२ जलस्रोतांव्यतिरिक्त पाण्याची आवश्यकता भासल्यास पुन्हा पाणवठे तयार केले जाणार असून कोका अभयारण्यासाठी ८ कृत्रिम जलस्रोत प्रस्तावित असल्याची माहिती आहे.

पाण्यासाठी दाही दिशा
उन्हाळ्यात जंगलात पाणी मिळत नसल्याने प्राणी गावाकडे धाव घेतात. या संधीचे सोने करीत सावजासाठी टिपून बसलेले शिकारी वन्यप्राण्यांचा शोध घेतात. जंगलातच पाण्याची व्यवस्था झाल्यास प्राणी सुरक्षित अधिवास करतील. वनविभागाने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नसíगक पाणवठय़ांबरोबरच कृत्रिम जलस्रोत उभारून वन्यजीव सरंक्षणासाठी पाऊल उचलले आहे.