शहराजवळील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत, काल पोलिसांवर दगडफेक करणा-या तसेच पोलिसांचे वाहन अडवून आरोपींच्या अटकेत अडथळा आणणा-या, चार महिलांसह १८ जणांना तीन दिवस, दि. २५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
या घटनेतील ४० ते ४५ आरोपी अद्यापि पसार आहेत. हे सर्व जण आलमगीर परिसरात राहणारे आहेत. आलमगीर व नागरदेवळे भागात पोलीस बंदोबस्त कायम आहे. पूर्वनियोजित कट करून जमावाला पोलिसांविरुद्ध चिथावणी दिली गेल्याचा व त्यातून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा अधिका-यांना संशय वाटतो आहे. त्यादृष्टीनेही चौकशी केली जात आहे.
शेख अफ्रोज बिलाल, अब्दुल रहेमान, सय्यद शौकत सुलेमान, शेख रहेमान, बापू केशव पाखरे, शेख फिरोज बिलाल, शेख अब्दुल कादीर, शेख शाहरूख अब्दुल, सेख मोबीन, शेख इक्बाल यासीन, शेख अब्दुल कद्दूस, शेख मोहसीन मुनीर, शेख अब्दुल इम्रान गणी, सलीम चाँद शेख, शेख फरजाणा, अबीद रहिस सय्यद, अंजूम आफ्रोज मोमीन व सय्यद रुक्साना गलाम अली (सर्व रा. आलमगीर) यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी आज दिला.