ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत जिल्ह्य़ातील तीन संस्थांमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी २ क ोटी ७५ लाख रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. यामध्ये चिखली तालुक्यातील कोलारा येथील सिद्धेश्वर देवालय, लोणार तालुक्यातील जाफ्राबाद येथील आश्रुबाबा महाराज संस्थान आणि जळगाव जामोद तालुक्यातील सखाराम महाराज संस्थानचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे यांची उपस्थिती होती.
  जिल्ह्य़ात बरीच धार्मिक संस्थाने आहेत. मात्र, सदर संस्थानांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश होत नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना कोणत्याच सुविधा मिळत नव्हत्या. यासाठी आपण पुढाकार घेऊन ही ठिकाणे तीर्थक्षेत्राच्या दर्जात आणण्यासह त्यांना ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्य़ातील आतापर्यंत १७ संस्थानांना ‘ब’ दर्जा मिळवून देण्यात यश आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत विकासासाठी निधी मिळावा म्हणून आपण त्या तीर्थक्षेत्रांसाठी मंजूर झालेल्या एकूण २ क ोटी ७५ लाख रुपयांच्या निधीमधून सखाराम महाराज संस्थान, जळगाव जामोद या संस्थानसाठी १ क ोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून येथे पुरुष आणि महिलांसाठी दोन स्वतंत्र भक्त निवास, पोच मार्गाचे बांधकाम, स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वाहनतळ निर्माण केले जाणार आहेत.
 आश्रुबाबा महाराज संस्थान जाफ्रोबादसाठी ६० लाखांचा निधी मिळाला असून यामध्ये स्वच्छतागृह, संरक्षण भिंत तसेच महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र भक्तनिवासाचे बांधकाम केले जाणार आहे तर कोलारा येथील सिद्धेश्वर देवालय संस्थानाला ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र भक्त निवास, पोच मार्गाचे बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम, रस्त्याच्या बाजूला नालीचे बांधकाम आणि वाहनतळ असे विकास कामे केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली. या सोबतच जिल्ह्य़ातील दुष्काळाच्या बाबतीत देखील त्यांनी चिंता व्यक्त करून आणेवारी मोजण्याची पद्धत आणि वास्तविकतेपेक्षा कमी आणेवारी दाखविण्याचे काम जिल्ह्य़ाच्या महसूल प्रशासनाने केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.