News Flash

धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; दोघांना पोलीस कोठडी

एसएमएसच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना रविवारी न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

| August 12, 2013 01:45 am

एसएमएसच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना रविवारी न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारी मोबाईलवरील एसएमएसद्वारे धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता. ‘दिल-दोस्ती-प्यार’ या पद्धतीचा संदेश एकमेकांना देण्यात येत होता. यामुळे मिरज शहरात रात्रीपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी दीपक नंदलाल तनवाणी (वय २३, रा. गणेश नगर पाटील गल्ली) व विक्रम राजकुमार मोहनानी (वय २७ रा. श्यामराव नगर सांगली) या दोघांना अटक केली. त्यांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन पाटील यांच्यासमोर उभे केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:45 am

Web Title: 2 arrested due to trying religious crookedness
टॅग : Arrested
Next Stories
1 कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी ७ हजारांची मागणी
2 सत्ताधारी व विरोधकांकडून परस्परांचा निषेध
3 पुण्यात लुटल्याचा बदला शिर्डीत ; भिकाऱ्यांच्या हत्यासत्रातील खुनी सापडला
Just Now!
X