श्रीगोंदे नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून पूर्वी सतरा नगरसेवक होते. आता दोन नगरसेवक वाढले असून ही संख्या १९ झाली आहे.
सर्वसाधारण वर्गासाठी ६, याच वर्गातील महिलांसाठी ६, ओबीसींसाठी ५ (३ महिला, २ पुरुष), अनुसूचित जमातीसाठी १ व या जातींसाठी १ अशी आरक्षणे जाहीर झाली आहेत. आरक्षण जाहीर झाल्यापासूनच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यादृष्टीनेच चाचपणी सुरू आहे. अजूनही प्रभागरचना न झाल्याने अनेक इच्छुक अंधारात आहेत. मात्र शहरातील गणेशोत्सावावरही निवडणुकीचाच राजकीय प्रभाव आहे.