04 March 2021

News Flash

सोलापूरजवळ रिक्षाला टँकरने ठोकरल्याने दोघांचा मृत्यू; ७ जखमी

धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या अरबी मदरशातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला पाठीमागून टँकरची धडक बसल्याने घडलेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांसह अरबी मदरशातील सेवकाचा मृत्यू झाला, तर अन्य सात विद्यार्थी जखमी

| April 29, 2013 01:17 am

धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या अरबी मदरशातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला पाठीमागून टँकरची धडक बसल्याने घडलेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांसह अरबी मदरशातील सेवकाचा मृत्यू झाला, तर अन्य सात विद्यार्थी जखमी झाले. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
फैसल लियाकत सय्यद (वय १४, रा. साखर पेठ, सोलापूर) हा विद्यार्थी आणि अरबी मदरशातील सेवक घुडूभाई महिबूब बागवान (वय ४८, रा. साखर पेठ) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. जखमींमध्ये सलमान मनियार (वय १४), नबीलाल अ. कादर मालदार (वय १४) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना यथील छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साखरपेठेतील हाशमपीर अरबी मदरशातील विद्यार्थी एका धार्मिक कार्यक्रमासाठी रिक्षात बसून कुंभारी येथे गोदूताई परुळेकर विडी घरकुलाकडे निघाले होते. विडी घरकुलाच्या अलीकडे पेट्रेल संपल्याने रिक्षा जागेवर थांबली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या टँकरची सदर रिक्षाला धडक बसली. वळसंग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 1:17 am

Web Title: 2 died 7 injured in rickshaw tanker collision near solapur
टॅग : Died,Injured,Solapur
Next Stories
1 शहापूर, सातवे व कोडोली गावांवर शोककळा
2 बेळगाव जिल्हय़ात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करून खून
3 सहायक पोलीस आयुक्तावर खुनी हल्ला; दोघा हल्लेखोरांना पोलीस कोठडी
Just Now!
X