जिल्ह्य़ात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. कोल्हापूर-सांगली मार्गावर हेर्ले येथे अज्ञात वाहनाची धडक बसल्याने प्रितम नंदकुमार जाधव हा अपघातात ठार झाला, तर पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघबीळ जवळ झालेल्या अपघातात प्रशांत विलासराव पाटील यांचा अंत झाला.
 हेर्ले येथे राहणारा प्रितम जाधव हा युवक येथील विवेकानंद महाविद्यालयात कॉमर्स विभागात तिस-या वर्षांमध्ये शिकत होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडला होता. त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे. चार वर्षांपूर्वी अपघात झालेल्या ठिकाणी एस. टी. घरात घुसून अपघात झाला होता. त्यामध्ये प्रितम व त्याचे वडील नंदकुमार हे दोघे जखमी झाले होते.     
दरम्यान वाघबीळ येथे प्रशांत पाटील हा मित्राच्या दुचाकीवरून पैजारवाडीकडे जात असताना समोरून येणा-या ट्रकने धडक दिली. या अपघातात प्रशांत जागीच ठार झाला. अपघात झाला तरी अध्र्या तासाहून अधिक काळ मृतदेह घटनास्थळी पडून होता. प्रशांतच्या मित्रांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. प्रशांत पाटील हा येथील लक्षतीर्थ वसाहतीत राहात होता. माजी उपमहापौर सुभाष पाटील यांचे ते पुतणे होते.