25 February 2021

News Flash

धूमस्टाईलने २ महिलांचे दागिने लांबवले

भरधाव वेगात मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन महिलांच्या गळयातील सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीचे अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ओरबाडून धूम स्टाईलने पलायन

| May 10, 2013 01:42 am

भरधाव वेगात मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन महिलांच्या गळयातील सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीचे अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ओरबाडून धूम स्टाईलने पलायन केले. या घटना शिर्डी शहरात घडल्या. शिर्डी पोलिसांनी यासंदर्भात तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक मोटारसायकल जप्त केली आहे. येथील न्यायालयाने या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
एच. एस. जालीअली (वय ४७, रा. आंध्रप्रदेश) हे सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी व भावजयीच्या समवेत शिर्डीतील नगर-मनमाड रत्याने बसस्थानकासमोरून साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना काळय़ा रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी जालीअली यांच्या भावजईच्या गळयातील सुमोर १ लाख ८० हजार रुपयांचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पलायन केले.
रघुनंद सर्वन्यम (वय ३६, रा. बंगलोर) हे आई व अन्य नातेवाईकांसमवेत िपपळवाडी रस्त्याने साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या तरुणांनी रघुनंद यांची आई वेदम्मा हिच्या गळय़ातील १ लाख ५० हजार रुपयांचे पाच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून धूमस्टाईलने पलायन केले. याबाबत शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुध्द दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
शिर्डी पोलिसांनी बुधवारी रात्री मोहिन फारुख शेख (वय २०, रा. गणेशनगर) सादिक शफिक मन्सुरी वय १८ राबियानगर सचिन उत्तम खरे (वय १९, रा. राहाता) या तीन आरेापींना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. आज या आरोपींना राहाता येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींकडून धूमस्टाईलने केलेल्या राहाता व शिर्डी परिसरातील अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:42 am

Web Title: 2 womens jewellery snatched with dhoom style
Next Stories
1 संगमनेरकरांना चिंता ‘रित्या’ भंडारदऱ्याची!
2 सोलापुरात उद्यापासून तीन दिवस शिवालय व्याख्यानमालेचे आयोजन
3 पेटवून घेतलेल्या आईसह मुलाचाही भाजून मृत्यू
Just Now!
X