17 October 2019

News Flash

विज्ञान प्रदर्शनात २० प्रकल्प सादर

चेहेडी येथील एस. के. पांडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विज्ञान, भूगोल व पर्यावरण प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सुमारे २० प्रकल्प सादर केले.

| January 11, 2014 02:46 am

चेहेडी येथील एस. के. पांडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विज्ञान, भूगोल व पर्यावरण प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सुमारे २० प्रकल्प सादर केले.
प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त प्रवीण जोशी यांच्या हस्ते झाले. प्राचार्य अलका एकबोटे यांनी प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनाचा हेतू स्पष्ट केला. प्रवीण जोशी यांनी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित ‘फुंकर’ दीप प्रज्वलित करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. जोशी यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती भावी काळात विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणाऱ्या ठरतील असा आशावाद व्यक्त केला. प्रदर्शनात पूर नियंत्रण यंत्र, जलविद्युत निर्मिती, अपघात सूचक यंत्र, ध्वनीपासून वीजनिर्मिती अशा विविध वैज्ञानिक प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनासह भूगोल विषयांतर्गत ‘राज्य कोपरा’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यांची संस्कृती, वैज्ञानिक तसेच लोकजीवन आदींविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

First Published on January 11, 2014 2:46 am

Web Title: 20 projects in science exhibition
टॅग Science Exhibition