महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित व्यवस्थापन आणि संशोधन संस्थेचा तीनदिवसीय ‘झेस्ट २०१३’ हा वार्षिक महोत्सव ‘पिपाणी’फेम अभिनेत्री नम्रता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
व्यासपीठावर संचालक डॉ. व्ही. एस. मोरे, सपकाळ नॉलेज हबचे रवींद्र सपकाळ, डॉ. प्रशांत सूर्यवंशी, डॉ. जे. व्ही. भालेराव, डॉ. प्रवीण मुळे, डॉ. आशुतोष मोरे उपस्थित होते.
सध्या व्यवस्थापनास अतिशय महत्त्व असून कठोर मेहनतीशिवाय पर्याय नसल्याचे नम्रताने सांगितले. रवींद्र सपकाळ यांनी विद्यार्थ्यांनी पुढे जाण्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवावी, असे नमूद केले. या वेळी व्यापार योजना, नृत्य आणि फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षक म्हणून संतोष पाटील, पल्लवी पाटील, जयंत हुनरगीकर, किरण तिवारी आणि नम्रता जाधव यांनी काम पाहिले. महोत्सवात जिल्ह्यातील २२ व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महोत्सव यशस्वितेसाठी प्रा. गणेश तेलतुंबडे, प्रा. ज्योती कौजलगी, गौरी राठी आदींनी प्रयत्न केले. या महोत्सवातील विविध स्पर्धामध्ये शिवानी पाटील, शांतिकुमार देशपांडे, सुमित कुलथे, अक्षय शेटे, पीयूष सुळे, अविनाश गुर्जर, बादल होटलकर, प्रमिती सिंग, स्नेहा आनंद, अंकिता भगत, गोपाळ पाटील, सोनल उगले, स्नेहा आनंद, कोमल संकलेचा, योगेश चासकर, विनिता देवरे, प्राची हाटकर, शुभांगी वडे यांनी यश मिळविले. ग्रुप फॅशन शोमध्ये दयाल जाधव व ग्रुप (एमजीव्ही आयएमआर महाविद्यालय) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.