News Flash

जनश्री विमा योजनेतंर्गत २३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

शहरातील मुंबई नाका मित्र मंडळप्रणित लोकनिर्माण प्रकल्पातर्फे जनश्री विमा योजनेंतर्गत २३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

| May 31, 2013 02:33 am

शहरातील मुंबई नाका मित्र मंडळप्रणित लोकनिर्माण प्रकल्पातर्फे जनश्री विमा योजनेंतर्गत २३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी आ. वसंत गीते, स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, डॉ. प्रदीप पवार, मनसे गटनेते अशोक सातभाई, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, जयंत जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ होते. आ. गीते यांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम लोकनिर्माण प्रकल्पाच्या वतीने केले जात असतानाच लाभार्थ्यांनीही या योजनांची माहिती इतरांना करून देण्याची गरज व्यक्त केली. साहाय्यक कामगार आयुक्त जाधव यांनी शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
महापौर अ‍ॅड. वाघ यांनीही मार्गदर्शन केले. लोकनिर्माण प्रकल्पातंर्गत जनश्री विमा योजनेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६०० रुपये शिष्यवृत्तीचे    वाटप    करण्यात  आले. सूत्रसंचालन प्रा. कैलास मोरे यांनी केले. आभार शोभा ठाकरे यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 2:33 am

Web Title: 23 students given janshri insurance scheme scholarship
Next Stories
1 देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मारक आवश्यक- डॉ. विनायक गोविलकर
2 ज्ञान अमृत आदिवासी संस्थेचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
3 ग्रामीण भागातील विद्यालयांचे निकाल समाधानकारक