आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिघाच्या बाहेर पाहायला शिकले पाहिजे. स्वयंशिस्त हवी, तसेच समाजाचे काही देणे लागते म्हणून समाजासाठी काही ना काही केलेच पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी केले.
विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या २७व्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या भक्तिगीत गायन, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी संजयकुमार बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. सोळुंके होते. संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, श्रीमंतराव शिसोदे, कोषाध्यक्ष तुषार शिसोदे, विद्यार्थी संसद सचिव कृष्णा भुमरे उपस्थित होते. प्रा. अनिल लहाने यांनी सूत्रसंचालन केले.
विविध स्पर्धामधील विजेते पुढीलप्रमाणे- वक्तृत्व : रोहित देशमुख, भरत रिडलॉन, संदीप शिंदे, उत्तेजनार्थ- धम्मपाल जाधव. वादविवाद : वैष्णवी मुळे, चित्ततीश खांडेकर, धम्मपाल जाधव, उत्तेजनार्थ- सचिन जाधव, भरत रिडलॉन. भक्तिगीत गायन : माध्यमिक विभाग- चैत्राली बाबेरे, समीक्षा जहागीरदार, सावनी गोगटे, अपूर्वा झोलगीकर; उच्च माध्यमिक विभाग : राजेश तुपे, आरती उगले, नितीन गायकवाड, सपना जाधव, उत्तेजनार्थ- मृणाल जोशी, मनोज थोरे, संदीप तांबट, मकरंद पाटील.