सोलापुरातील विविध कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून हवालाद्वारे लाखोंची रोकड रेल्वेने परगावी जात असताना रेल्वे पोलिसांनी छापा टाकून तिघा जणांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे २२ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. या तिघा जणांविरुद्ध सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रात्री सोलापूर रेल्वे स्थानकात हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेसने काही कुरिअर कंपन्यांचे कर्मचारी हवाला म्हणून मुंबई व अन्य ठिकाणी पोहोच करण्यासाठी २२ लाखांची रोकड व सोने घेऊन निघण्याच्या बेतात होते. परंतु मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दत्ता चाबुकस्वार यांनी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर छापा घालून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडे २२ लाखांची रोकड तसेच सोने सापडले. हा किमती ऐवज कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून मुंबईला पोहोच करण्यासाठी आपण जात असल्याची माहिती त्या तिघा तरणिांनी दिली. चौकशीअंती हा प्रकार संशयास्पद असल्याचे आढळून आल्याने तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mobile thieves arrested 30 mobiles seized in kandivali
मुंबई : सराईत मोबाइल चोरांना अटक, ३० मोबाइल हस्तगत
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!