News Flash

वकीलपुत्राला बेदम मारहाण; पोलीसपुत्रासह तिघांना अटक

पोलीस वसाहतीत येऊन महिलांबरोबर बोलतो, याचा राग मनात धरून एका वकीलपुत्राला डांबून बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसाच्या मुलासह तिघा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| July 2, 2013 01:40 am

पोलीस वसाहतीत येऊन महिलांबरोबर बोलतो, याचा राग मनात धरून एका वकीलपुत्राला डांबून बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसाच्या मुलासह तिघा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुरारजी पेठेतील पोलीस कल्याण केंद्राजवळ हा प्रकार घडला.
आल्हाद अरविंद अंदोरे (वय २०, रा. अभिमानश्रीनगर, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार स्वप्नील भाऊ शिंदे या पोलीसपुत्रासह नागेश खरात व महेश यमगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील शिंदे याने आल्हाद यास नरसिंग गिरजी गिरणी चाळीत कामानिमित्त बोलावून घेतले. नंतर त्यास पोलीस कल्याण केंद्राजवळ आणून एका खोलीत डांबून ठेवले. आमच्या वसाहतीत येऊन महिलांबरोबर बोलतोस काय, लफडे करतोस काय, असे विचारून या तिघा जणांनी त्यास बेदम मारहाण केली. पोलिसांनी या तिघा जणांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 1:40 am

Web Title: 3 arrested with son of police for beating to son of lawyer
टॅग : Arrested,Beating
Next Stories
1 ‘संशोधनात आमूलाग्र क्रांती घडविणारी नवी पिढी घडविण्याची गरज’
2 ब्राह्मणगावचा शुभम शिंदे याचे आयआयटी परीक्षेत यश
3 गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांना खरेच पाणी मिळणार का? – अॅड. रविकाका बोरावके
Just Now!
X