मुंबईहून चिपळूणकडे डांबर घेऊन चाललेला टँकर (एमएच ०४ इएफ ३८९३) पाटण तालुक्यातील ऊरूल घाटात दीडशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात टँकर चालक, वाहकासह प्रवासी म्हणून बसलेला पोलीस जमादार जागीच ठार झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला मात्र, दुपारी साडेतीनच्या सुमारास मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.
टँकर चालक सिद्धार्थ दहीफळे (रा. परळी वैजनाथ) क्लीनर महेश (पूर्ण नाव माहिती नाही) प्रवासी म्हणून बसलेले व कोयनानगर पोलीस ठाण्यात डय़ुटीसाठी निघालेले पोलीस जमादार अंकुश कुंभार (वय ५५, रा. तळबीड, ता. कराड) अशी अपघातातील मृतांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.