News Flash

शेतीच्या वीज बिलात वर्षभर ३३ टक्के सवलत

नजर आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असलेल्या दुष्काळग्रस्त गावातील शेती वीजपंपाच्या एक वर्षांच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून शेतकऱ्यांनी योजनेचा

| March 21, 2013 01:10 am

नजर आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असलेल्या दुष्काळग्रस्त गावातील शेती वीजपंपाच्या एक वर्षांच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्च अखेरीपर्यंत उर्वरित ६७ टक्के बिल भरणे आवश्यक आहे, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी संचालक संतोष सांगळे यांनी दिली.
महावितरणने वीज बिल वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली असून विजेचे रोहित्र बंद ठेवले जात आहेत. वसुली बंदचा आदेश सरकारने दिलेला नसल्याने मोहिम हाती घेण्यात आली आहे. वीज बिल वेळेवर भरले तर शेतकऱ्यांनाच फायदा होईल असे ते म्हणाले.
पाणी योजनेच्या वीज बिलात ६७ टक्के सवलत देण्यात आली असून ग्रामपंचायतींना केवळ ३३ टक्के थकीत वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. मोठय़ा प्रमाणात सवलत मिळणार असल्याने ग्रामपंचायतींनीही बिलाचा भरणा लवकर करावा, असे ते म्हणाले. मुळा-प्रवराच्या कार्यक्षेत्रात शेती वीज ग्राहकांकडे १६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेवन बिलाचा भरणा केला तर भारनियमण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यात सिंगल फेज विज पुरवठा लवकरच सुरू होणार आहे. कार्यक्षेत्रात फिडर सेपरेशनसाठी सव्‍‌र्हेक्षण सुरू झाले असन ६६ कोटी रुपयांच्या निविदा मंजर झाल्या आहेत. हे काम भारत इलेक्ट्रीकल्सला मिळाले असन कार्यारंभ आदेशही त्यांनी घेतला आहे. पुढील महिन्यात कामास प्रारंभ होत असून येत्या वर्षभरात घरगुती वीज ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जाणार आहे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2013 1:10 am

Web Title: 33 discount in this year on electricity bill of farming
टॅग : Farming
Next Stories
1 वाईतील पाणी पळवले भाजपच्या क्षीरसागर यांचा आरोप
2 शेतकऱ्यांप्रमाणे परिटांचीही वीज व कर्जमाफीची मागणी
3 वडार समाजाच्या आरक्षणासंदर्भात वर्षभरात घोषणा करणार
Just Now!
X