मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीसाठी एलईडी दिव्यांचा पर्याय स्वीकारला असून प्रायोगिक तत्त्वावर विविध प्रकारचे ३५० एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. दादर रेल्वे स्थानकात या दिव्यांचा वापर करण्यात आला आहे. फलाट, आरक्षण केंद्र, स्थानक परिसर येथे हे दिवे बसविण्यात आले असून यामुळे वार्षिक सात लाख रुपयांची बचत होणार आहे.हे दिवे बसविण्यात आल्यामुळे नेमकी किती वीज लागते, याची माहिती मिळण्याची यंत्रणाही येथे सुरू करण्यात आली आहे. विद्युतभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘जीपीएस’यंत्रणेचीही मदत घेण्यात येणार आहे. लॅपटॉप, भ्रमणध्वनी, संगणक यांच्या माध्यमातून या प्रणालीवर कोणत्याही ठिकाणाहून नियंत्रण ठेवता येणार आहे.