सोलापूर जिल्हय़ातील मतदारांची संख्या ३० लाख ३८ हजार ४८० इतकी झाली असून, यात १६ लाख ६ हजार १५० पुरुष व १४ लाख ३२ हजार ३३० महिलांचा समावेश आहे. १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या ३४ हजार ९९६ एवढी आहे.
जिल्हय़ात ३२९० मतदानकेंद्रे असून, या सर्व ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व तहसील कार्यालयांमध्ये मतदारयाद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. याबाबतची माहिती देताना निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे यांनी सांगितले, की गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत दोन लाख ९२ हजार मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली होती. यात दुबार नोंदणी व मृत मतदारांचा समावेश होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी मतदारांच्या प्रारूपयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्या वेळी २९ लाख १९ हजार ६३१ मतदारसंख्या निश्चित करताना पुन्हा ३३ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर एक लाख १८ हजार ८४९ मतदारांची नावे वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या ३० लाख ३८ हजार ४८०वर पोहोचली.
तालुकानिहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे : अक्कलकोट-तीन लाख १० हजार १७, दक्षिण सोलापूर-दोन लाख ७७ हजार ४०७, सोलापूर शहर मध्य-दोन लाख ६० हजार ९८१, सोलापूर शहर उत्तर-दोन लाख ५६ हजार २७८, मोहोळ-दोन लाख ७७ हजार ४३५, पंढरपूर-दोन लाख ८२ हजार ६५७, माढा-दोन लाख ८६ हजार ३४७, माळशिरस-दोन लाख ८३ हजार ६३१, करमाळा-दोन लाख ६६ हजार २७१, सांगोला-दोन लाख ५९ हजार ६५२ व बार्शी-दोन लाख ७७ हजार ८०४.